पत्रकारांकडून चित्रपटाच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया
- गेले काही महिने राजपूत संघटना, राष्ट्रप्रेमी संघटना, मंत्री, खासदार, आमदार विरोध करत असतांना त्यांना हा चित्रपट दाखवण्याऐवजी काही पत्रकारांना दाखवून त्याच्या समर्थनार्थ प्रचार करण्याचा निर्मात्याचा हा प्रयत्न हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे ! याचाही वैध मार्गाने विरोध झाला पाहिजे !
- अशा प्रकारे चित्रपट दाखवून त्याचे समर्थन करण्याचा होणारा प्रयत्नच सांगत आहे की, या चित्रपटात दाखवण्यात आलेला इतिहास अयोग्य आहे; अन्यथा निर्मात्याने विरोध करणार्या संघटनांनाच आधी हा चित्रपट दाखवून त्यांचे शंकानिरसन केले असते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
‘पद्मावती’ चित्रपटाच्या निर्मार्त्याने वरिष्ठ पत्रकार, रजत शर्मा, अर्णव गोस्वामी, वेद प्रकाश आदींना खाजगीरित्या दाखवला. त्यानंतर या पत्रकारांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यात त्यांच्याकडून ‘या चित्रपटात कोणताही आक्षेपार्ह भाग नाही’, असे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘चित्रपट पाहून करणी सेनेला आणि भाजपला चित्रपटाला विरोध केल्याचा पश्चात्ताप होईल’, असे अर्णव गोस्वामी यांनी म्हटले आहे.
यापुढे संपादकांकडूनच चित्रपटाचे प्रमाणपत्र घ्या ! – राष्ट्रवादी पत्रकार रोहित सरदाना यांची उपरोधिक टीका
पत्रकारांना दाखवण्यात आलेल्या पद्मावतीचित्रपटाच्या वेळी ‘आज तक’ वृत्तवाहिनीचे पत्रकार रोहित सरदाना हेही उपस्थित होते; मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्यावर ट्विट करून त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात त्यांनी लिहिले आहे, ‘‘यापुढे चित्रपट बनवणार्यांनी संपादकांकडूनच प्रमाणपत्र घेतले पाहिजे. संपादक म्हणूनच सेन्सॉर बोर्डावर नेहमीच टीका करत असतात. त्यामुळेच वाटते की, बोर्डाऐवजी त्यांनाच चित्रपट दाखवायला हवा.’’ (चित्रपट निर्मात्यांना अशा प्रकारे खडसावणारे पत्रकार रोहित सरदाना यांचे अभिनंदन ! असे पत्रकारच राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीतरी करू शकतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
नवी देहली :१७ नोव्हेंबरला ‘पद्मावती’ चित्रपटाच्या निर्मात्याने काही वरिष्ठ पत्रकारांना हा चित्रपट दाखवला. यावर केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे (सेन्सॉर बोर्डाचे) अध्यक्ष प्रसून जोशी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘चित्रपट निर्मात्यांनी असे करणे हे अत्यंत चुकीचे आहे’, असे ते म्हणाले.
प्रसून जोशी म्हणाले की,
१. केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने अद्याप चित्रपट पाहिलेला नाही आणि प्रमाणपत्रही दिलेले नाही; परंतु निर्मात्याने तो आधीच खाजगीरित्या इतरांना दाखवला आणि आता त्याचे राष्ट्रीय दूरचित्रवाहिन्यांवर समीक्षण करण्यात येत आहे. हा चुकीचा प्रकार आहे. त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे.
२. एकीकडे चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये वेग आणण्यासाठी मंडळावर दबाव आणला जात आहे आणि दुसरीकडे मंडळाची प्रक्रिया संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
३. पद्मावतीच्या प्रमाणपत्रासाठी याच आठवड्यात अर्ज मिळाला होता. निर्मार्त्यांना माहिती आहे की, कागदपत्रे पूर्ण करण्यात आलेली नाहीत. चित्रपट ‘फिक्शन’ (काल्पनिक) आहे कि ऐतिहासिक हे कागदपत्रांवरून कळत नाही. कागदपत्रे अर्धवट असल्याचे आणि श्रेणीचा (कॅटेगरीचा) उल्लेख न केल्यामुळे त्याची पूर्तता करण्यासाठी चित्रपट परत पाठवला; तरीही आश्चर्य म्हणजे सेन्सॉरबोर्डच प्रदर्शनाला उशीर करत असल्याचा आरोप केला जात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात