Menu Close

राणी पद्मावती चित्रपटातील विडंबनात्मक भाग वगळण्याची हिंदु मक्कल कत्छी आणि राजपूत संप्रय यांची मागणी

मदुराई (तमिळनाडू) : राणी पद्मावती चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी राणी पद्मावतीविषयी विडंबनात्मक भाग वगळण्यात यावा, अशी मागणी हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष) आणि राजपूत संप्रय कुटुंबीय यांनी नुकतीच येथे आयोजित एका निषेध मोर्च्यामध्ये केली. हिंदु मक्कल कत्छीचे श्री. सोलाई कन्नन आणि राजपूत संप्रय कुटुंबीय यांनी याविषयीचे एक निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले. चित्रपटाचे निर्माते संजय भन्साळी यांनी चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळावा, राजपूत कुटुंबियांकडून त्याला संमती मिळवावी आणि नंतरच चित्रपट प्रदर्शित करावा, असे या निवेदनात म्हटले आहे.

खासदार देवजी पटेल यांची पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची केंद्र सरकारकडे मागणी

जयपूर : राजस्थानच्या जालोर-सिरोही येथील खासदार देवजी पटेल यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी, राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आणि  केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष यांना पत्र लिहून पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

सनी देओल यांच्याप्रमाणे एकतरी अभिनेता बोलतो का ?

भन्साळी यांनी घाम गाळून चित्रपट बनवला असेल; मात्र राजपुतांनी त्यांचा इतिहास रक्त सांडून बनवला आहे. – अभिनेता सनी देओल

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *