वाई (जिल्हा सातारा) : सांगली येथील पोलीस कोठडीतील हत्या प्रकरण म्हणजे पोलीस दलाचे अपयश मानावे लागेल. या घटनेत सहभागी उपनिरीक्षकाच्या वरिष्ठ अधिकार्यापासून ते पोलीस महासंचालक पदापर्यंतच्या सर्वांचेच हे अपयश आहे, असे मत निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी येथे व्यक्त केले. (एका पोलीस अधिकार्याला असे सांगावे लागणे, हे पोलीस दलासाठी लज्जास्पद आहे. आतातरी पोलीस दल जनताभिमुख कारभार करून सर्वसामान्य जनतेला आश्वस्त करतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
ते पुढे म्हणाले, ‘‘आमच्या काळातही गुन्हेगारांना ‘थर्ड डिग्री’चा वापर होत होता. असे का करावे लागते, याचा शोध घेतला असता प्रकरणांचा छडा लावण्याचे प्रचंड दडपण पोलिसांवर असते, असे लक्षात आले. (दडपण घालवण्यासाठी साधना करणे हाच पर्याय आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) वरिष्ठ अधिकारी, प्रसारमाध्यमे, तक्रारदार आदींचा तपास अधिकार्यांवर प्रचंड दबाव असतो. त्या वेळी तपास करण्यासाठी साधने आणि अन्य मार्ग अल्प होते. यातून अशा गोष्टी घडायच्या.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात