Menu Close

श्रीनगर येथील पोलीस ठाण्यावरील आक्रमणाचे दायित्व इसिसने स्वीकारले

भारतात इसिसच्या कारवाया चालू असल्याचा आणखी एक पुरावा ! असे किती पुरावे मिळाल्यानंतर भारत सरकार इसिसचा निःपात करणार ?

श्रीनगर : १७ नोव्हेंबरला श्रीनगरच्या जाकूरा येथे आतंकवाद्यांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या आक्रमणाचे दायित्व इसिसने स्वीकारले. इसिसने त्याच्या ‘एहमाक’ या वृत्तसंस्थेच्या संकेतस्थळावर एक ‘पोस्ट’ टाकून त्यात हे स्पष्ट केले. या आक्रमणात एक उपनिरीक्षक हुतात्मा झाला होता, तर एक आतंकवादी ठार झाला होता. ठार झालेल्या आतंकवाद्याने इसिसचे चिन्ह असलेला काळ्या रंगाचा ‘टी शर्ट’  घातला होता. त्यामुळे काश्मीरमध्ये इसिस सक्रीय होणार असल्याचा गुप्तचर विभागाचा संशय खरा ठरला आहे.

२३ ऑक्टोबर या दिवशी काश्मीरमध्ये गुप्तचर विभागाने एक ट्विटर अकाऊंट शोधले होते. त्यात काश्मीरमध्ये इसिसचा पहिला गट सिद्ध करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सध्या हे अकाऊंट बंद करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *