- विज्ञानाने केलेली पृथ्वीची ही स्थिती सुधारून तिला तिचे पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी धर्माधिष्ठित सनातन धर्माची स्थापना करणे अपरिहार्य आहे !
- सनातन धर्म पर्यावरणपूरक आहे. अशा धर्माचे योग्य पालन केल्यास निसर्ग आपसूकच चांगला होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने धर्मपालन करायला हवे !
मेलबर्न : पृथ्वीला वाचवण्यासाठी फारच अल्प वेळ शिल्लक राहिला आहे. जर त्वरित काही उपाययोजना केली नाही, तर फार मोठी हानी होऊ शकते, अशी चेतावणी वैज्ञानिकांनी दिली आहे. येथे पृथ्वीच्या संदर्भात १८४ देशांच्या १५ सहस्र वैज्ञानिकांच्या उपस्थितीत परिषद आयोजित करण्यात आली होती.
१. प्रा. विलियम रिपल यांनी म्हटले की, पृथ्वीला वाचवण्याच्या संदर्भात ही दुसरी चेतावणी देण्यात आली आहे.
२. वैज्ञानिकांनी म्हटले की, ओझोनला पडलेल्या छिद्राची माहिती २५ वर्षांपूर्वीच देण्यात आली होती. आता तर त्याची स्थिती अधिक वाईट झाली आहे. ताज्या पाण्यावर २६ टक्के परिणाम झाला आहे. ३०० कोटी एकर जंगल नष्ट झाले आहे. २५ वर्षांत स्तनधारी जीव, पक्षी आदीं २९ टक्के प्राणी नष्ट झाले आहेत. स्थिती वाईट असली, तरी त्यात सुधारणा येऊ शकते. यासाठी आपल्याला दिनचर्येत पालट करावा लागणार आहे. लोकसंख्येवर नियंत्रण आणावे लागणार आहे. मांसाहारऐवजी शाकाहार करावे लागेल. तसेच सोलर ऊर्जेचा वापर करावा लागेल. याद्वारे हानी रोखता येऊ शकते.
३. ओझोनची स्थिती ९ ठिकाणी थोडीशी चांगली झाली आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी प्राध्यपक, पत्रकार आदींनी पुढे यायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात