Menu Close

बांगलादेशातील हिंदूंची लोकसंख्या ५ टक्क्यांपेक्षा अल्प होण्याच्या मार्गावर

फाळणीच्या वेळी पाक आणि बांगलादेश येथे असणार्‍या हिंदूंच्या लोकसंख्येत प्रचंड घसरण झाली , तर भारतात मुसलमानांच्या लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली, ही स्थिती ‘कुठल्या देशात असहिष्णुता आहे ?’, हे दर्शवते; मात्र या विरोधात एकही पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी बोलत नाही !

• पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंप्रमाणे पुढील काही दशकांनंतर भारतातील हिंदूंची स्थिती झाली, तर आश्‍चर्य वाटू नये !

• केंद्रातील भाजप सरकारने शेजारील देशांतील हिंदूंच्या रक्षणासाठी कृती करावी, अशीच भारतातील हिंदूंची अपेक्षा आहे !

नवी देहली : वर्ष १९०१ मध्ये तेव्हाचा पूर्व बंगाल म्हणजेच आजच्या बांगलादेशमधील हिंदूंची लोकसंख्या ३३ टक्के होती. ती आज केवळ ८.५ टक्के उरली आहे. तेथील हिंदूंवर धर्मांधांकडून होणारे अत्याचार असेच चालू राहिले, तर हीच लोकसंख्या ५ टक्क्यांपेक्षा अल्प होण्यास अधिक वेळ लागणार नाही. एकदा तसे झाले की, हिंदूंच्या समोर एकतर धर्मांतर अथवा स्थलांतर या व्यतिरिक्त अन्य पर्याय उरणार नाहीत, असे बांगलादेशमधील हिंदू संघटनांच्या नेत्यांनी म्हटले आहे.

१. नुकतेच रंगपूर जिल्ह्यातील ठाकूरपारा येथे २० सहस्र धर्मांधांच्या जमावाने हिंदूंची घरे, दुकाने जाळली आणि लुटली. मंदिरांचा विध्वंस केला.

एका हिंदूने कथितरित्या फेसबूकवर इस्लामची निंदा करणारा मजकूर टाकल्याचे निमित्त होऊन ही घटना घडली. अशीच घटना गेल्या वर्षी ब्राह्मणबारा येथे घडली होती. या व्यतिरिक्त अशा अनेक लहानसहान घटना प्रतिदिन घडत आहेत.

२. ‘बांगलादेशमधील कुठलाच हिंदु फेसबूकवर इस्लामची निंदा करणारा मजकूर टाकणार नाही. हा सर्व बनाव धर्मांधांकडून हिंदूंची फेसबूक खाती ‘हॅक’ करून केला जात आहे. म्हणजे आतंकवाद्यांना मुसलमानांना भडकावणे सोपे जाते’, असे हिंदु संघटनेचे नेते श्री. गोविंद प्रामाणिक यांनी सांगितले.

३. ‘हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांना तेथील प्रसारमाध्यमांत प्रसिद्धी मिळत असली, तरी महिला आणि मुले यांचे बळजोरीने होणारे धर्मांतर, हिंदूंच्या मालमत्ता बळजोरीने  हिसकावून त्यांना तेथून पळवून लावणे, नोकर्‍यांमध्ये भरती न करणे अशा प्रकारच्या भेदभावाच्या घटनांना प्रसारमाध्यमांत प्रसिद्धी मिळत नाही. बांगलादेशमधून हळूहळू हिंदूंचे स्थलांतर होत आहे’, अशी माहिती श्री. रिपन रॉय यांनी दिली.

४. हिंदूंवरील अत्याचारासाठी धर्मांध अन्य मार्गही अवलंबत आहेत. त्यांत हिंदु महिला आणि मुली यांचा विनयभंग करणे, लहान हिंदु दुकानदारांवर बहिष्कार टाकणे, स्थानिक इमामांद्वारे हिंदूंच्या सणांवर अनधिकृतपणे निर्बंध आणणे, असे प्रकार होत आहेत.

५. स्वातंत्र्यपूर्व काळात पूर्व बंगालमधील हिंदूंची लोकसंख्या न्यून होण्यास प्रारंभ झाला. ती वर्ष १९०१ मध्ये ३३ टक्के, वर्ष १९११ मध्ये ३१ टक्के, वर्ष १९२१ मध्ये ३०.६ टक्के, वर्ष १९३१ मध्ये २९.४ टक्के आणि वर्ष १९४१ मध्ये २८ टक्के अशा प्रमाणात न्यून होत गेली. म्हणजे ब्रिटीशकालीन आणि त्यापूर्वी मोगल शासकांकडूनही हिंदूंवर अत्याचार होतच होतेे, हे याचे द्योतक आहे.

६. स्वातंत्र्यानंतर उदयास आलेल्या पूर्व पाकिस्तानात हिंदूंची संख्या २२ टक्के शिल्लक राहिली. ती वर्ष १९६१ मध्ये १८.५ टक्के, तर वर्ष १९७१ मध्ये १८.५ टक्के होती. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याचे दमनसत्र चालू झाल्यावर ती १३.५ टक्के एवढी उरली.

७. वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशाची निर्मिती झाली, तेव्हापासून १९८१ पर्यंत ती १२.१३ टक्के, वर्ष १९९१ मध्ये १०.५ टक्के, वर्ष २००१ मध्ये ९.२ टक्के, वर्ष २०११ मध्ये ८.९६ टक्के असलेली लोकसंख्या आता केवळ ८.५ टक्के एवढीच उरली आहे.

८. धर्मांधांनी सिद्ध केलेल्या नियोजनाप्रमाणे त्यांना वर्ष २०३१ पर्यंत हिंदूंची लोकसंख्या ६ टक्क्यांवर आणायची आहे. एकदा ५ टक्क्यांच्या खाली आली म्हणजे त्यांचे धर्मांतर किंवा स्थलांतर करणे सोपे जाईल, असे नियोजन धर्मांध करत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *