कॅलिफोर्नियामध्ये हिंदु-अमेरिकी समुदायाच्या पाठ्यपुस्तक चळवळीला यश
कॅलिफोर्निया : येथील हिंदु-अमेरिकी समुदायाच्या पाठ्यपुस्तक चळवळीला मोठे यश प्राप्त झाले आहे, असे ‘हिंदु एज्युकेशन फाऊन्डेशन’ने नुकतेच घोषित केले. ‘एच्एम्एच्’ या प्रकाशकाची २ हिंदुद्वेषी पुस्तके राज्य शिक्षण मंडळाने हटवली आहेत. तसेच इतर प्रकाशकांच्या पुस्तकांमध्ये हिंदु-अमेरिका समुदायाने सूचवलेल्या दुरुस्त्या मंडळाने स्वीकारल्या आहेत.
कॅलिफोर्नियामधील सहस्रावधी हिंदू या चळवळीत सहभागी झाले होते. सहस्रावधी पालक आणि त्यांची मुले राज्य शिक्षण मंडळाच्या बैठकांना उपस्थित रहात होती. राज्यातील हिंदु समुदायाने दाखवलेल्या एकजुटीने मंडळाला प्रभावित केले होते. ४ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर हिंदु समुदायाला हे यश मिळाले.
राज्यातील काही हिंदुद्वेषी गटांनी हिंदु समुदायाची चळवळ बंद पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु हिंदूंनी हा विरोध परतवून लावला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात