काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर यांविषयी देशद्रोही विधान केल्याचे प्रकरण
‘राष्ट्रहानी आणि धर्महानी रोखा’, अशी मागणी करावी लागते, हे खेदजनक !
वाराणसी : मागील काही दिवसांत भारतात देशद्रोही कारवायांना ऊत आला आहे. या देशद्रोह्यांवर कारवाई व्हावी, यासाठी शहरातील राष्ट्राभिमानी आणि धर्माभिमानी यांनी विविध ठिकाणी वैध मार्गाने निषेध केला. त्याविषयीचा आढावा येथे देत आहोत.
वाराणसी येथील धर्माभिमानी अधिवक्त्यांकडून फारूक अब्दुल्ला यांच्या विरोधात सरकारला निवेदन
वाराणसी : काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्या संदर्भात सार्वजनिक विधान करून भारत आणि भारतीय सैन्य यांच्या विरोधात अप्रत्यक्ष युद्ध छेडणारे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या विरोधात येथील धर्माभिमानी अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी सहकारी अधिवक्त्यांच्या समवेत जिल्हाधिकार्यांच्या वतीने राष्ट्रपती आणि संरक्षणमंत्री यांना निवेदन दिले.
बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवरील अमानुष अत्याचारांच्या विरोधात निवेदन
यासमवेतच बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर तेथील धर्मांधांकडून करण्यात येत असलेल्या अमानुष अत्याचारांच्या विरोधात बांगलादेशाचा निषेध करून त्यांचे रक्षण करावे आणि अशा हिंदूंना भारताचे स्थायी नागरिकत्व देण्यात यावे, याकरता धर्माभिमानी अधिवक्त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री आणि केंद्र सरकार यांना निवेदन दिले. हे निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगालाही पाठवण्यात आले. जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी वीरेंद्र पांडेय यांनी या निवेदन स्वीकारले.
वाराणसी येथे धर्माभिमानी अधिवक्त्यांकडून प्रशासनाला निवेदन
प्रशासनाला हे का सांगावे लागते ? कूरकर्मा टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणार्या संस्थेवर कारवाई करावी !
वाराणसी (उत्तरप्रदेश) : क्रूरकर्मा शासक टिपू सुलतान याचे उदात्तीकरण करणार्या कार्यक्रमाचे आयोजन करणार्या जमीअतुल अंसार या संस्थेवर बंदी घालावी, तसेच आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, याकरता येथील धर्माभिमानी अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी सहकारी अधिवक्त्यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी वीरेंद्र पांडेय आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन दिले. या वेळी शिष्टमंडळात अधिवक्ता अवनीश राय, अधिवक्ता विनोद पटेल, अधिवक्ता सुरेंद्र यादव, अधिवक्ता चंद्रशेखर सिंह, अधिवक्ता अनुप सेठ, अधिवक्ता चंदन त्रिपाठी आदी उपस्थित होते.
इतर मागण्या
१. धोकादायक पॉलिथीनवर कायदेशीर बंदी घालावी !
२. शहरातील बांधकामे आणि डिझेलवर चालणारी वाहने यांच्यावर बंदी घालावी !
-
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन
-
ताजमहालच्या बंद खोल्या उघडून त्याचे खरे स्वरूप उघड करावे !
-
हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्येचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्याची मागणी !
वाराणसी (उत्तरप्रदेश) : प्रेमाचे स्मारक समजण्यात येणारा ताजमहाल मुसलमानांचा नव्हे, तर मुळात परमार्दीदेव राजाने निर्मिलेली हिंदु वास्तू असून आक्रमणकर्त्या मोगलांनी त्याला ‘ताजमहाल’ नाव दिले आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी, काही पुरातत्व तज्ञ, देश-विदेशातील इतिहासतज्ञ यांनी त्या संदर्मात अनेक पुरावेही दिले आहेत. त्यामुळे हे भवन मुमताजचे थडगे आहे कि हिंदु वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे, याविषयी खरा इतिहास समोर येण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तज्ञांची एक समिती नेमावी, तसेच पुरातत्व विभागाचे अधिकारी, पोलीस, निवृत्त न्यायाधीश, पत्रकार आणि धार्मिक क्षेत्रातील अधिकारी यांच्या समोर ताजमहालमधील बंद खोल्या उघडून त्याचे खरे स्वरूप उघड करावे. जोपर्यंत ताजमहालचे खरे स्वरूप कळत नाही, तोपर्यंत तेथील नमाजपठन बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकार्यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
या समवेतच मागील काही वर्षांपासून केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, बंगाल या राज्यांनंतर आता पंजाब, उत्तरप्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना वेचून ठार करण्यात येत आहे. या घटनांची चौकशी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवून खरा सूत्रधार शोधावा, तचेस या घटनांच्या अन्वेषणात उदासीन असणार्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
या शिष्टमंळामध्ये ‘इंडिया विथ विसडम्’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, विश्व हिंदु महासंघाचे शिवपूर मंडल अध्यक्ष श्री. शुभम मिश्रा, हिंदु जागरण मंचचे श्री. रवि श्रीवास्तव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी, अधिवक्ता मनीष राय, अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता अवनीश राय, अधिवक्ता स्वतंत्र सिंह, अधिवक्ता राजेश पाण्डेय, अधिवक्ता सुनीलकुमार, अधिवक्ता विकास तिवारी आदी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात