कमल हसन यांनी हिंदूंचा अवमान केल्याचे प्रकरण
चेन्नई : अभिनेते कमल हसन यांनी हिंदूंच्या विरोधात अवमानकारक विधान केल्याच्या प्रकरणी निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने १५ नोव्हेंबर या दिवशी वळ्ळुवर कोट्टम, चैन्नई येथे निषेधमोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या निषेधमोर्च्यामध्ये हिंदु जनजागृती समितीने सहभाग घेतला. या वेळी शिवसेनेचे नेते, हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् आणि श्री. काशिनाथ शेट्टी यांनी हिंदुत्वनिष्ठांना संबोधित केले. अधिवक्त्या लेखा संकरन् यांनी कमल हसन यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे या वेळी सांगितले.
राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडे करण्यात आलेल्या मागण्या
१. अभिनेते कमल हसन यांना हिंदूंच्या विरोधात अवमानकारक विधान केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात यावी.
२. तमिळनाडूमध्ये सरकारने मंदिरांचे व्यवस्थापन धर्माभिमान्यांकडे सुपूर्द करावे.
३. ‘स्लम क्लिअरन्स बोर्ड’ ने कह्यात घेतलेली मूलाकोठलम् येथील हिंदूंची स्मशानभूमी परत करावी.
४. जीवनावश्यक वस्तूंवरील ‘वस्तू आणि सेवा कर’ अल्प करावा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात