मुंबई : विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने गोरेगाव पूर्व येथे ‘पद्मावती’ या वादग्रस्त चित्रपटाला विरोध करण्यासाठी १८ नोव्हेंबर या दिवशी वैध मार्गाने करण्यात येणार्या आंदोलनाला वनराई पोलीस ठाणे (गोरेगाव) यांनी ऐनवेळी अनुमती दिली नाही. वादग्रस्त पद्मावती चित्रपटातून राणी पद्मावती यांचा प्रत्यक्ष इतिहास वगळून भडक आणि असबंद्ध चित्रण करून हिंदूच्या प्रेरणास्थानांना अपकीर्त केले जात आहे. या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना वैध मार्गाने आंदोलन करणार होत्या १५ नोव्हेंबर या दिवशी या संदर्भात पोलिसांनी आयोजकांना १४९ नोटीसही दिली होती. मात्र ऐन वेळी पोलिसांनी अनुमती नाकारल्याने ‘आम्हाला वैध मार्गानेही आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आडकाठी केली जाते’, अशी नाराजी आयोजक श्री. संदीप सिंग आणि अन्य हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केली. (इतिहासद्रोह्यांना संरक्षण आणि हिंदुत्वनिष्ठांना नोटीस हीच पोलिसांची कार्यपद्धत आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात