हिंदूंच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर सरकार इतक्या विलंबाने निर्णय घेते, हे लज्जास्पद !
मुंबई : महाराष्ट्रातील देशी दारूची दुकाने आणि ‘बिअर बार’ यांना देवता, महापुरुष आणि गडकिल्ले यांची नावे देता येणार नाहीत, असा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. या संदर्भात लवकरच अधिसूचना काढण्यात येणार आहे. मार्चमध्ये विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे देशी दारू, बिअर बार यांना महापुरुषांचे नाव न देण्याची मागणी केली होती. (राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळातच पंडित यांनी अशी मागणी का केली नाही ? आताही मार्चमध्ये मागणी केल्यावर नोव्हेंबरमध्ये त्यावर निर्णय होतो, याला गतीमान कारभार कसा म्हणणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘त्यांची नावे दिल्याने देवता, महापुरुष आदींचा अवमान होतो आणि हे राज्याच्या संस्कृतीला शोभणारे नाही’, असे त्यांनी म्हटले होते. (सातत्याने हिंदुद्रोही भूमिका घेणार्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशी वक्तव्य करतात, यावरून त्यांना आता हिंदूंच्या मतांचे मूल्य कळू लागले आहे, हेच खरे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
अमरसिंह पंडित यांच्या सूचनेनंतर उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामगार विभाग आणि उत्पादन शुल्क खात्यातील अधिकारी यांच्याशी चर्चा करून कामगारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. यासाठी कामगार कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात