- यापूर्वी अनेकदा आतंकवाद्याच्या अंत्ययात्रेत सहस्रो धर्मांधांनी सहभागी होऊन देशविरोधी घोषणा दिल्याच्या घटना घडल्या असतांना अशा अंत्ययात्रांवर पीडीपी-भाजप सरकार बंदी का घालत नाही ?
- आतंकवाद्याच्या अंत्ययात्रेत देशविरोधी घोषणा देणार्यांवर सरकारने आतापर्यंत कोणती कारवाई केली, हेही त्यांनी जनतेला सांगायला हवे !
श्रीनगर : काश्मीरमध्ये इसिसने (इस्लामिक स्टेटने) आतंकवादी कारवाया चालू केल्या आहेत. या संघटनेला आता स्थानिक मुसलमानांचे समर्थन मिळू लागले आहे. १९ नोव्हेंबरला श्रीनगर-गुलमर्ग रोडवरील पारम्पोरा परिसरात एका आंतकवाद्याच्या अंत्ययात्रेत सहस्रो मुसलमान सहभागी झाले होते. त्यांनी या वेळी इसिसच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्या वेळी हुरियत कॉन्फरन्सच्या विरोधात ‘ना हुर्रियतवाली शरीयत, ना हुर्रियतवाली आजादी, कश्मीर बनेगा दारुल इस्लाम,’ अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच सुरक्षादलाच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या.
तहरीक-उल-मुजाहिदीन संघटनेचा आतंकवादी मुगीस अहमद मीर याला सैन्याने ठार केले होते. त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या वेळी त्याचा मृतदेह इसिसच्या झेंड्यात गुंडाळण्यात आला होता. ‘जम्मू-काश्मीरमध्ये चालू असलेल्या आतंकवादावर इसिसचा किती प्रभाव आहे, याचा आम्ही तपास करत आहोत’, असे जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात