Menu Close

जळगाव येथे ‘दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शित करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने चित्रपटगृह व्यवस्थापकाला भाग पाडले

दबावतंत्राद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा चित्रपट प्रदर्शित करण्यास भाग पाडणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हिंदूंनी निवडणुकीद्वारे जागा दाखवून दिल्यास नवल ते काय !

जळगाव : हिंदु धर्मियांच्या श्रद्धेवर घाला घालणार्‍या ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या समर्थनार्थ आता संभाजी ब्रिगेड पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही उडी घेतली आहे. शहरातील रिगल चित्रपटगृहात १९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १२ वाजताचा खेळ चालू करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने भाग पाडले. या वेळी खासदार उदयनराजे भोसले यांचे चुलत बंधू विशालराजे भोसले हेसुद्धा उपस्थित होते. या वेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, प्रतिभा शिरसाट आदि महिला कार्यकर्त्यांसह विशालराजे भोसले तसेच इतर कार्यकर्तेही उपस्थित होते.

मागील २ दिवसांपासून ‘दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शित करण्यावरून श्री भगवान परशुराम सेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यामध्ये वाद चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने रिगल चित्रपटगृहात ‘दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शित करण्यास दबाव आणल्यामुळे नाईलाजाने चित्रपट दाखवण्यात आला. (‘हलाल’ चित्रपटाला मुसलमानांनी केलेल्या विरोधामुळे त्या चित्रपटावर त्वरित बंदी घातली गेली. हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘दशक्रिया’ चित्रपटाला विरोध केला तर राष्ट्रवादीकडून चित्रपटाचे समर्थन का ? यावरून राष्ट्रवादी पक्ष हिंदूविरोधी आहे, हेच ध्वनीत होत नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *