-
हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
-
नाकिरेकल, (नाल्लागोंडा, तेलंगण) येथे हिंदु रक्षा दलाच्या वतीने हिंदू संमेलनाचे आयोजन
नाल्लागोंडा (तेलंगण) : आज हिंदु धर्मावर विविध आघात होत आहेत. गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रीय अस्मिता यांची विटंबना मोठ्या प्रमाणात होत आहे. या समस्यांमागील मूळ कारण हे देशाने स्वीकारलेली धर्मनिरपेक्ष व्यवस्था आहे. ही स्थिती पालटण्यासाठी देशात पुन्हा धर्माच्या आधारावर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हाच पर्याय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे तेलंगण राज्य समन्वयक श्री. चेतन जनार्दन गाडी यांनी हिंदु रक्षा दलाच्या वतीने नाकिरेकल (जिल्हा नाल्लागोंडा, तेलंगण) येथे आयोजित हिंदू संमेलनाला संबोधित करतांना केले. अलीकडेच हे संमेलन पार कडले. या संमेलनाला संबोधित करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्यात आले होते. या संमेलनाला परिसरातील ५ गावांमधून २५० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. या सभेचा प्रसार हिंदु जनजागृती समितीचे २ कार्यकर्ते आणि २ धर्मप्रेमी यांनी केला होता. त्याला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
२. गावातील धर्मप्रेमी युवक तेथील मुख्य मार्गाने वाहन फेरी काढून सभेला आले. या वेळी त्यांनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या घोषणांनी गावातील वातावरण हिंदुमय झाले होते.
३. स्थानिक धर्मप्रेमी फलक प्रदर्शन लावणे, बैठक व्यवस्था, रांगोळी काढणे, व्यासपिठाची सिद्धता करणे तसेच सभेनंतर साहित्य आवरणे आदी सेवांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
४. कार्यक्रमस्थळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र आणि धर्म या विषयावर फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. यात धर्मशिक्षण, हिंदु राष्ट्र, गोहत्या, मंदिर सरकारीकरण, काश्मीर आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचार, क्रांतीकारक आदी विषयांचा समावेश होता. या फलकांवर असलेली वैशिष्ट्यपूर्ण माहिती जाणून घेण्यास धर्मप्रेमींनी रस दाखवला.
५. सभेनंतर झालेल्या संवाद बैठकीत अशाच प्रकारच्या सभांचे अन्य ३ गावांमध्ये आयोजन करण्याचा हिंदुप्रेमींनी निश्चय केला.
६. संवाद बैठकीत एका पाक्षिक धर्मसत्संगाचे आयोजन करण्यात आले.
७. सभेच्या स्थळापासून ८ किलोमीटर अंतरावर राणी रुद्रमा यांची समाधी आहे. त्या ठिकाणी राणी रुद्रमा हिने मोगलांशी युद्ध करून वीरमरण पत्करले होेते. या स्थळाला ऐतिहासिक स्थळ करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात