Menu Close

हिंदू समाज धर्मरक्षणार्थ कृतीशील झाल्यास विजय नक्की ! – धर्माभिमानी श्री. श्रीनाथ

शिवमोग्गा, कर्नाटक येथील सागर येथे धर्माभिमानी एकवटले !

धर्माभिमानी श्री. श्रीनाथ आणि श्री. विजय रेवणकर

सागर (कर्नाटक) : संघटितपणे कृती करणार्‍या हिंदूंची संख्या अल्प आहे. असे असले, तरी हिंदु समाज धर्मरक्षणासाठी कृतीशील झाला, तर भगवंताच्या कृपेने आपण नक्कीच विजयी होऊ. हिंदु जनजागृती समिती चांगले कार्य करत आहे. आम्ही सर्व जण तिला साहाय्य केले पाहिजे, असे प्रतिपादन धर्माभिमानी श्री. श्रीनाथ यांनी हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या धर्मसभेला संबोधित करतांना केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील तोटगार्स सभागृहात १६ नोव्हेंबर या दिवशी धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय रेवणकर म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वी भारत हिंदु राष्ट्र होता; परंतु राजकीय नेत्यांनी भारताला सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) राष्ट्र बनवले. आतापर्यंत भारतीय राज्यघटनेत १०० वेळा पालट करण्यात आले आहेत.

क्षणचित्र

सभेनंतर घेण्यात आलेल्या संवाद सभेत २ धर्मशिक्षणवर्ग, १ अभ्यासवर्ग आणि १ ग्रामसभा घेण्याविषयी धर्मप्रेमींनी मागणी केली.

विजयपूर (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन

धर्मरक्षण करण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे, ही काळाची आवश्यकता ! – श्री. संतोष भटकळकर, हिंदु जनजागृती समिती

विजयपूर (कर्नाटक) : ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणे हे अध्यात्म आहे. धर्मरक्षण करण्यासाठी सर्व हिंदूंनी धर्माचरण करणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंचे प्रत्येक धर्माचरण हे आध्यात्मिक दृष्टीने लाभदायक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष भटकळकर यांनी येथील श्री साई मंदिर, साईपार्क येथे नुकत्याच झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत केले. या सभेला परिसरातील नागरिक आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *