Menu Close

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत वणी आणि यवतमाळ येथे धरणे आंदोलन

वणी (यवतमाळ) : वणी येथील तहसील चौकात १९ नोव्हेंबरला आणि यवतमाळ येथील दत्त चौकात २० नोव्हेंबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात देशभरातील हिंदूंच्या हत्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला सांगून त्यातील तथ्य जनतेसमोर आणून त्यानुसार कारवाई करावी आणि ताजमहाल हे मुमताजचे थडगे आहे कि हिंदूंचा तेजोमहालय यासाठी तज्ञांची समिती नेमून सत्य जगासमोर आणावे अशा मागण्या करण्यात आल्या.

आंदोलनाच्या यशस्वितेसाठी सर्वश्री संजय पांडे, लोभेश्‍वर टोंगे, विष्णूपंत खाडे, संजय सिप्पी, कैलास सुरसे यांसह अनेक कार्यकत्यांनी प्रयत्न केले.

क्षणचित्रे

१. वणी येथे स्वत:हून ७ हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले.

२. यवतमाळ येथे पोलीस अनुमती असूनही फौजफाट्यासह पोलिसांनी येऊन अनुमतीपत्राची मागणी केली. अनुमती दाखवल्यानंतर ते परत गेले. (अनुमती असतांनाही त्याची मागणी करणारे पोलीस त्यांच्या प्रशासनातील समन्वयाचा अभावच दर्शवतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *