हिंदुत्वनिष्ठ आणि ब्राह्मण समाज यांच्या संघटित आंदोलनाला मोठे यश !
हिंदूंच्या धर्मभावना दुखावणार्या या चित्रपटावर आता देशभर बंदी येण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे अपेक्षित !
जळगाव : ब्राह्मण समाजाच्या संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केलेल्या संघटित आंदोलनामुळे दशक्रिया या हिंदुद्वेषी चित्रपटाचे येथील सर्व खेळ रहित करण्यात आले.
जळगाव शहरातील चित्रपटगृहांमध्ये सलग २ दिवस या संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे या चित्रपटाचे खेळ बंद पाडण्यात आले होते. त्यामुळे चित्रपटगृहाच्या मालकांना प्रेक्षकांच्या तिकिटांचे पैसे परत करावे लागले होते. यावर अनेक प्रेक्षकांनी चित्रपटगृहाच्या मालकांना चित्रपटाचा खेळ रहितच करायचा होता, तर तो आरक्षित का केला ?, असा प्रश्न विचारत ग्राहक मंचाकडे तक्रारी करण्याच्या चेतवण्या दिल्या. त्यामुळे चित्रपटगृहाच्या मालकांनी कोणतेही दायित्व न स्वीकारता शहरातील सर्व चित्रपटगृहांमधील दशक्रिया चित्रपटाचे खेळ बंद करत असल्याचे घोषित केले, तसेच त्याचे ऑनलाईन आरक्षणही बंद केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात