Menu Close

कन्नूर (केरळ) येथे संघाच्या ४ स्वयंसेवकांवर प्राणघातक आक्रमण

आणखी किती दिवस केरळमध्ये अशा घटना चालू रहाणार आहेत ? स्वतःच्या कार्यकर्त्यांचे रक्षण करू न शकणारे हिंदूंचे रक्षण कसे करतील ?

कन्नूर : २१ नोव्हेंबर या दिवशी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ४ कार्यकर्त्यांवर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. चौघांच्याही चेहर्‍यावर आघात करण्यात आले. तत्पूर्वी २० नोव्हेंबरला माकपच्या सभेवर बॉम्ब फेकण्यात आला होता. यात एक कार्यकर्ता घायाळ झाला. माकपने या प्रकरणी भाजपवर आरोप केला होता. (माकपकडून भाजप आणि संघ कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जात असल्याच्या आरोपावर माकप का बोलत नाही ? माकपची सत्ता असतांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत, हे त्याच्या लक्षात येत नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

मेरठमध्ये संघ कार्यकर्त्याची हत्या

केरळप्रमाणेच आता उत्तरप्रदेशातही संघाच्या कार्यकर्त्यांची हत्या होऊ लागली आहे. राज्याच्या मेरठ जिल्ह्यामध्ये सुनील गर्ग या स्वयंसेवकाचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. तो लोखंडाचा प्रसिद्ध व्यापारी होता. त्याच्या चेहर्‍यावर धारदार हत्याराने वार केल्याचे पोलिसांना आढळून आले. (माकपच्या केरळ राज्याप्रमाणे आता भाजपच्या राज्यातही संघ कार्यकर्त्यांच्या हत्या होणे राज्य सरकारला लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *