कोल्हापूर : केंद्र आणि राज्य शासन यांच्या साहाय्याविना रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन साकारण्यात येईल. हिंदु समाजाच्या साहाय्याने येत्या पावणेदोन वर्षांत या सिंहासनाचे काम पूर्ण केले जाईल. ३२ मण सुवर्ण सिंहासन पुन्हा हिंदवी स्वराज्य घडवण्याची स्फूर्ती देईल, असे मार्गदर्शन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते कोल्हापूर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहराध्यक्ष श्री. शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधाकर सुतार, श्री. शिवानंद स्वामी, श्री. रोहित पाटील, श्री. अभिषेक जाधव यांसह अन्य उपस्थित होते.
पू. भिडेगुरुजी पुढे म्हणाले,
१. या सिंहासनासाठी हिंदु समाजाने साहाय्याचा हात द्यावा. राष्ट्रीयत्वाची जाण असलेल्या लोकांनी राष्ट्रीयीकृत अधिकोषात श्रीशिवप्रतिष्ठानच्या खात्यावर चलनाद्वारे साहाय्य जमा करावे. प्रत्येक तरुणाने एक ग्रॅम सोने द्यावे.
२. राष्ट्रीयत्व निर्माण करण्यासाठी हिंदु समाजाने आपली परंपरा, संस्कृती यांचे जतन केले पाहिजे.
३. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वकीय आणि परकीय यांच्यासमवेतही अनेक लढाया लढाव्या लागल्या. त्या काळात काही स्वकियांनीही शत्रूला साहाय्य केले. आजही तशीच परिस्थिती आहे.
४. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम पिढ्यान्पिढ्या मार्गदर्शक ठरणारा आहे.
५. हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी शिवचरित्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात