सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. भूषण स्वामी यांचे अभिनंदन !
सातारा : श्रीक्षेत्र सज्जनगड येथील श्री रामदासस्वामी संस्थानच्या अध्यक्षपदी समर्थवंशज श्री. भूषण स्वामी यांची नियुक्ती झाली आहे. याविषयी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्री. भूषण स्वामी यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य विश्वव्यापी होवो ! – श्री. भूषण स्वामी
सनातनचे कार्य मी जवळून अनुभवले आहे. सनातनची नियतकालिके माझ्या वाचनात असतात. अध्यात्माचे शास्त्रशुद्ध भाषेत विवेचन करणारी सनातन संस्था अध्यात्मात करत असलेले संशोधन कार्यही मी जवळून पाहिले आहे. काही वर्षांपूर्वी सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीक्षेत्र सज्जनगड येथे पिप प्रणालीद्वारे श्री समर्थ समाधीचे परीक्षण केले होते. तसेच श्री समर्थांचे जन्मगाव जांब येथेही त्यांचे परीक्षण केले होते. त्याविषयीची ध्वनीचित्र-चकतीद्वारे सिद्ध केलेली अप्रतिम माहिती त्यांनी मला पाठवली होती. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेले हिंदु जागृतीचे कार्य नि:स्पृह असून कौतुकास्पद आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य दिवसेंदिवस वृद्धींगत होऊन विश्वव्यापी होवो, अशी श्री समर्थ चरणी प्रार्थना !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात