Menu Close

उरण, धुतूम (जिल्हा रायगड) येथे प्रथमच हिंदु धर्मजागृती सभा पार पडली

१३० धर्माभिमान्यांची उपस्थिती

सभेला उपस्थित हिंदु धर्माभिमानी

उरण, धुतूम (जिल्हा रायगड) : येथे १९ नोव्हेंबर या दिवशी भैरवनाथ मंदिरात प्रथमच हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. १३० धर्माभिमानी सभेसाठी उपस्थित होते.

ते म्हणाले, आपण इतर राजकीय पक्षांना महत्त्व देण्यापेक्षा कृष्णाच्या पक्षाला महत्त्व देऊन देवाचे भक्त व्हायला हवे. तसे झाल्यासच आपण येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत राहू शकतो. वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे. त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेतील अनेक प्रसंग सांगून भगवंतावर श्रद्धा ठेवल्यास तोच त्याचे कार्य करून घेतो. हिंदु राष्ट्र निर्मितीच्या ईश्‍वरी कार्यात सहभागी व्हा, तरच ईश्‍वराचा आशीर्वाद मिळेल !

त्यांनी कुलदेवतेच्या उपासनेचे, नामजपाचे महत्त्व सांगून पूर्वजांच्या त्रासाच्या निवारणार्थ श्री गुरुदेव दत्त हा नामजप सांगितला. तसेच श्रीमद्भगवद्गीतेतील अनेक प्रसंग सांगितले. श्री. योगेश ठाकूर यांनी सामूहिक प्रतिज्ञा करवून घेतली, तर सभेचे सूत्रसंचालन सौ. ऋषिका ठाकूर यांनी केले.

क्षणचित्रे

१. गावातील लोक स्वयंस्फूर्तीने इतरांना सभेचे निमंत्रण देत होते.

२. अशा सभा सर्वत्र व्हाव्यात, असे अनेक जण सांगत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *