Menu Close

छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून हिंदु राष्ट्राची स्थापना करा : हिंदु जनजागृती समिती

शिवजयंती उत्सवात सहभागी हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्यांचे प्रतिपादन

पुणे : छत्रपती शिवरायांनी पाच पातशाह्यांना धूळ चारत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज आपण छत्रपती शिवरायांचे गुणगान करत असलो, तरी त्यांचे गुण मात्र कृतीत आणत नाही. शिवरायांच्या भारतात आज हिंदु धर्म संपवण्याची कटकारस्थाने चालू आहेत. हिंदूंना त्यांच्या धर्मापासून तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदुत्वावर प्रतिदिन आघात होत आहेत. अशा परिस्थितीत छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येकाने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तीच खरी छत्रपती शिवरायांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन ठिकठिकाणच्या शिवजयंती महोत्सवात वक्ता म्हणून सहभागी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केले. शिवजंतीच्या निमित्ताने पुणे, शनिशिंगणापूर आणि फलटण (जिल्हा सातारा) येथे आयोजित शिवजयंती सोहळ्यामध्ये हिंदु जनजागृतीच्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करून तरुणांमध्ये राष्ट्रतेज आणि धर्मतेज चेतवले.

हिटलिस्टची भीती भारताला दाखवू नका ! – मिलिंद धर्माधिकारी

milind_dharmadhikari_dawikadun_dusre
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतांना मान्यवर
shanishingnapur_mirwnuk2 (1)
पारंपारिक वाद्यांसह काढण्यात आलेली मिरवणूक

श्री क्षेत्र शनिशिंगापूर : संपूर्ण भारताला इस्लाममय करू पहाणार्‍या इसिस या आतंकवादी संघटनेच्या हिटलिस्टवर भारत देश आहे. आम्ही शिवरायांचे वंशज आहोत त्यामुळे भारताला हिटलिस्टची भीती दाखवू नका, असे घणाघाती विचार हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. शनिशिंगणापूर युवा मंचच्या वतीने आयोजित शिवजयंती सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक काढण्यात आली. शनैश्‍चर माध्यमिक विद्यालयातील मुलांचे लेझीम पथकही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. सायंकाळी शिवजयंतीच्या सोहळ्याच्या प्रारंभी शंखनाद आणि त्यानंतर मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शनिशिंगणापूरचे सरपंच श्री. बाळासाहेब बानकर यांच्या हस्ते श्री. मिलिंद धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात शनैश्‍चर माध्यमिक विद्यालयातील मुलांनी छत्रपती शिवरायांची आरती क्षात्रवृत्तीपूर्ण गायली. यासाठी मुलांचा वक्त्यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. सोहळ्यास उपस्थित श्री. अशोक महाराज पवार यांनी छत्रपतींच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग उपस्थितांना सांगितले. या वेळी ५०० हून अधिक शिवभक्त उपस्थित होते.

…तर अफझलचा वध करणारे छत्रपती शिवराय घरोघरी निर्माण होतील ! – नागेश जोशी

फलटण : गेले काही दिवस जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी देशाच्या विरोधात आणि देशद्रोही अफझलच्या स्मरणार्थ दिलेल्या घोषणांचे प्रकरण गाजत आहे. त्या भारतविरोधी विद्यार्थ्यांनी आतंकवादी अफझलला सहानुभूती दर्शवत जर तुम्ही अफझलला माराल, तर घराघरात अफझल निर्माण होतील, असे वक्तव्य केले. त्यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानाचा कोथळा बाहेर काढणार्‍या छत्रपती शिवरायांचे आम्ही वंशज आहोत. त्यामुळे जर घराघरात अफझल निर्माण होणार असतील, तर त्या अफझलचा वध करणारे छत्रपती शिवाजीही घरोघरी निर्माण होतील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी केले. येथील भाजप तालुका उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्‍वर लावंड यांच्या वतीने आयोजित शिवयोद्धा शिवजयंती महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी मालोजीराजे शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. बी.के. निंबाळकर यांनीही उपस्थितांना संबोधित केले. श्री. भरत ढमाळ यांच्या हस्ते श्री. नागेश जोशी यांचा सत्कार करण्यात आला.

छत्रपती शिवरायांप्रमाणे हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी सिद्ध व्हा ! – चैतन्य तागडे

रहाटवडे (जिल्हा पुणे) : येथील शिवसह्याद्री मित्रमंडळाच्या वतीने आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, व्हिएतनाम हा देश छत्रपती शिवरायांना आदर्श मानतो. व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतात आल्यानंतर रायगडावरील माती त्यांच्या देशातील मातीत मिसळ्यासाठी नेली; जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरत्व या देशातील तरुणांमध्ये येईल. आपण छत्रपतींचे वंशज असल्याने त्यांच्याप्रमाणे हिंदु राष्ट्राची स्थापन करायची आहे. या वेळी शिवसह्याद्री मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री. मनोहर चोरगे यांच्या हस्ते श्री. तागडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला १२५ हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. या वेळी रहाटवडे गावचे उपसरपंच सर्वश्री सचिन चोरगे, माजी सरपंच राजेंद्र चोरगे, माजी पंचायत समिती सदस्य पोपटदादा चोरगे, उत्तम गोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन गोरे आाणि ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य लक्ष्मण चोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांचे गुण कृतीत आणा ! – मोनिका गावडे

कोंढवा : येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीचे श्री शिवछत्रपती प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय आणि अ‍ॅक्टिव्ह इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने शिवजंयती निमित्त आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या कु. मोनिका गावडे यांनी शाळेतील मुलांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नियोजन कौशल्य, सतर्कता, उत्तम पारख, काटकसरीपणा, नेतृत्व असे अनेकविध गुण स्वतःमध्ये आणण्यासाठी मुलांनी प्रयत्न करायला हवेत आणि महाराजांंचा मावळा बनायला हवे. या वेळी शाळेतील १०० विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील प्रश्‍नमंजुषा शाळेकडून घेण्यात आली, तसेच काही मुलांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी भाषणेही केली.

कात्रज : भारती विद्यापीठ येथील साम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शिवजयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. संदेश कदम यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची अपरिहार्यता उपस्थितांसमोर स्पष्ट केली. ते म्हणाले की, भारतापुढे सध्या इसिसचे आव्हान आहे. इसिसला संपवण्यासाठी हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक आहे, तसेच लव्ह जिहादच्या नावाखाली वाढत असलेल्या आतंकवादाला स्त्रियांनी बळी पडू नये. स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्त्रियांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाला ७५ हिंदू उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी निष्पक्षपणे करत असलेले कार्य जाणून सर्व ठिकाणी समितीच्या वक्त्यांना लोकांनी स्वत:हून मार्गदर्शनासाठी बोलावले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *