Menu Close

तणावपूर्ण स्थितीत स्थिर रहाण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर

आटपाडी (जिल्हा सांगली) : विधी, तसेच न्याय क्षेत्रात कार्य करतांना अधिवक्त्यांचे जीवन नेहमी तणावपूर्ण असते. अशा परिस्थितीत स्थिर रहाण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा आवश्यक आहे. साधना केल्यानेच ही ऊर्जा निर्माण होते. विविध प्रकारची विज्ञापने, चित्रपट, तसेच अन्य माध्यमांतून हिंदु देवता, राष्ट्रपुरुष, तसेच राष्ट्रीय सन्मानचिन्हे यांची विविध मार्गांनी होणारी विटंबना सनदशीर मार्गाने रोखणे हेच अधिवक्त्यांनी राष्ट्रासाठी केलेले योगदान राष्ट्राप्रती कर्तव्यपूर्ती ठरेल, असे मार्गदर्शन हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले.

१५ नोव्हेंबर या दिवशी बार असोसिएशनच्या सभागृहात अधिवक्त्यांसाठी ‘तणावमुक्त जीवनासाठी साधनेचे महत्त्व, तसेच राष्ट्र-धर्मकार्य यांत अधिवक्त्यांचे योगदान’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता विलासराव बाळकृष्ण पाटील, उपाध्यक्ष अधिवक्ता नीलकंठ निचळ, तसेच आटपाडी न्यायालयात सक्रीय असलेले १५ पेक्षा अधिक अधिवक्ता उपस्थित होते.

विशेष

१. सांगली जिल्हा अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष समीर पटवर्धन यांनी एका मोठ्या न्यायप्रक्रियेत साधनेमुळेच कसे स्थिर रहाता आले, ते सांगितले.

२. उपस्थितांपैकी काही अधिवक्त्यांनी ‘सनातन संस्थेच्या मिरज येथील आश्रमास भेट देऊ’, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

  1. Narottam Swami

    Plight of Hindus in Bengladesh and Pakistan is extremely miserable ,atrocities ,brutalities committed on them by muslims isrampant in these countries even in India in muslim dominated areas like Kashmir Hindus are cruelly treated by muslims ,example of Kashmiri pundits is a glaring example.Indian govt should extend its hand to support minorities Hindus of Bengladesh and Pakistan and in India Kashmiri Pundits must be restored their native place and should be given legal protection so that they may not be terrified by mjoirty of muslims and not be made to flee from their homeland.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *