मंडला (मध्यप्रदेश) येथे ‘हिंदु सेवा परिषदे’च्या ‘प्रथम प्रशिक्षणवर्गा’त हिंदुु जनजागृती समितीचा सहभाग
मंडला (मध्यप्रदेश) : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रभु श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श आमच्या समोर आहेत. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना साधना करून धर्मबळ प्राप्त करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. ‘हिंदु सेवा परिषदे’च्या वतीने येथे दोन दिवसीय ‘प्रथम कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गा’चे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाला संबोधित करतांना ते बोलत होते.
या वर्गाला हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे आणि समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी संबोधित केले. या वर्गाला जबलपूर, मंडला, सतना आणि शिवनी येथील हिंदु सेवा परिषदेचे निवडक ५० कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचा उद्देश हिंदु सेवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अतुल जेसवानी यांनी सांगितला. आभार प्रदर्शन परिषदेचे शहर अध्यक्ष श्री. निखिल कनोजिया यांनी केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात