मंडला (मध्यप्रदेश) येथे हिंदु सेवा परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांची पत्रकार परिषद
मंडला (मध्यप्रदेश) : सतीदेवी पद्मावतीने शिलरक्षणासाठी जोहार केला. धर्मसंस्कृतीच्या रक्षणासाठी बलिदान करून तिने आदर्श प्रस्थापित केला आहे. अशा राणी पद्मावतीला नाचतांना दाखवणे समस्त हिंदूंचा अपमान आहे. असा अपमान करणार्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केले. ‘हिंदु सेवा परिषद’च्या वतीने दोन दिवसीय ‘प्रथम कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गा’चे आयोजन करण्यात आले होते. या वर्गानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करतांना ते बोलत होते. या वेळी हिंदु सेवा परिषदेचे शहर अध्यक्ष श्री. निखिल कनोजिया यांनी प्रथम कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीतेविषयी पत्रकारांना माहिती दिली.
हिंदूंनी आता पाश्चात्त्य वेशभूषा करण्याविषयी विचार केला पाहिजे ! – सद्गुरु (डॉ.) पिंगळे
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्समधील एका लेखात ‘साडी हिंदुत्वाचे प्रतीक आहे’, असे प्रसिद्ध झाले होते. याविषयी बोलतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘हिंदूंनी आता पाश्चात्त्य वेशभूषा करण्याविषयी विचार केला पाहिजे. अशा घटनांमुळे हिंदू हिंदुत्वाकडे येत आहेत. हिंदु राष्ट्राविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘पुढील २-३ वर्षे नैसर्गिक आपत्तीमध्ये धर्मविरोधी प्रवृत्तीच्या लोकांचा नाश होईल. त्यानंतर सात्त्विक लोक संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्राची स्थापना करतील.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात