डोंबिवली : लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ हे वृत्तपत्र चालू केले, ते स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी ! सनातन संस्थेने ही नियतकालिके चालू केली, ती हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याच्या हेतूने, असे वक्तव्य श्री. अजय संभूस यांनी मेळाव्याचा उद्देश सांगतांना केले. डोंबिवली येथील दहिसर मोरी या गावात सनातन प्रभातच्या वाचकांचा मेळावा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमोल पालेकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन यांनी गुरुकृपायोगानुसार साधनेविषयी मार्गदर्शन केले.
क्षणचित्रे
१. वाचकांच्या गटचर्चेत सर्वांनी मिळून धर्मजागृती सभा घेण्याचे ठरले.
२. दहिसर येथे दत्तजयंतीला ग्रंथप्रदर्शन आणि प्रवचन यांचे नियोजन करण्यात आले.
३. ‘गावागावात प्रचार करण्यासाठी आम्ही वेळ देऊ’, असे उपस्थित वाचकांनी सांगितले. (कृतीशील होऊ इच्छिणारे वाचक हीच सनातन प्रभातची शक्ती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात