Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केरळ राज्यात केलेले व्यापक प्रसारकार्य !

१. आकाशवाणीवरून नवरात्र या विषयाचे प्रसारण

हिंदु जनजागृती समितीचे एक वेब व्हिजिटर केरळ येथील कम्युनिटी रेडिओमध्ये काम करतात. त्यांनी नवरात्रीचा विषय रेडिओमध्ये वाचून दाखवला.

२. प्रवचने

एर्नाकुलम् जिल्ह्यात नवरात्रोत्सवाच्या कालावधीत एकूण ५ ठिकाणी प्रवचने झाली.

अ. तेलगू समाजाच्या नवरात्री उत्सवात समितीच्या सौ. सुमा पुथलत यांनी नवरात्रीचे महत्त्व या विषयावर प्रबोधन केले. याचा ७५ जणांनी लाभ घेतला.
आ. सौ. विजया यांनी २ ठिकाणी बोम्मा कोल्लू (दक्षिण भारतात नवरात्रीत देवतांच्या बाहुल्या, तसेच सात्त्विक बाहुल्या एका विशिष्ट पद्धतीने ठेवून आरास करतात आणि त्यांची पूजा करतात. त्याला बोम्मा कोल्लू असे म्हणतात.) ठेवलेल्या ठिकाणी स्त्रियांना नवरात्रीचे महत्त्व सांगून त्यांच्याकडून नामजप करवून घेतला.
इ. नवमीच्या दिवशी एर्नाकुलम् येथील एरनाड देवीच्या मंदिरात आणि दशमीला एर्नाकुलम् येथील एळमकुळम् देवीच्या मंदिरात नवरात्र या विषयावरील प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते.

३. फलकप्रसिद्धी

एर्नाकुलम् जिल्ह्यातील १५ मंदिरांत नवरात्रीची माहिती देणारे फलक लावले.

४. भित्तीपत्रकांच्या माध्यमातून प्रसार

केरळ येथे नवरात्रीत अष्टमीला मुले अभ्यासाची पुस्तके पूजेसाठी देवळात ठेवतात आणि दसर्‍याच्या दिवशी पूजा करून झाल्यावर ती घरी घेऊन जातात. या वेळी विद्यादेवतेला कोणती प्रार्थना करायची ?, याची माहिती देणारी ए-४ आकारातील ३५ भित्तीपत्रके एर्नाकुलम् आणि अलप्पुळा या जिल्ह्यांतील मंदिरांत लावण्यात आली. या सेवेत ६ धर्मप्रेमी आणि वाचक सहभागी झाली होते.

– कु. प्रणिता सुखटणकर, केरळ (५.१०.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *