Menu Close

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे विवाहाचे आमीष दाखवून हिंदु तरुणीचे २ वर्षे लैंगिक शोषण केल्यावर विष पाजले !

  • लव्ह जिहाद नाकारणारे भाजपचे केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी हे याविषयी काही बोलतील का ?
  • प्रेमामध्ये धर्म पाहिला जात नाही, असे म्हणणारे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी धर्म लपवून, विवाह झाल्याचे लपवून आणि विवाह करण्याचे आमीष दाखवून लैंगिक शोषण करणे हे प्रेम असते का ?, याचे उत्तर देतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मुझफ्फरनगर : येथे उबैद उर रहमान उपाख्य कबीर या विवाहित तरुणाने स्वतः हिंदु असल्याचे सांगून आणि विवाहित असल्याचे लपवून हरिद्वार येथील एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. तिला विवाहाचे आमीष दाखवून तिचे २ वर्षे लैंगिक शोषण केले. त्यानंतर या तरुणीला उबैद याची वस्तूस्थिती कळल्यावर ती त्याच्या घरी जाऊन त्याला विरोध करू लागली. त्यामुळे उबैदच्या कुटुंबियांनी तिला मारहाण केली आणि तिला विष पाजले. ही तरुणी रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडल्याचे आढळल्यावर पोलिसांनी तिला रुग्णालयात भरती केले आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून ते उबैद याचा शोध घेत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *