Menu Close

पाकच्या मदरशांमध्ये मौलवीकडून मुलांवर बलात्कार होणे या नियमितच्या घटना ! – ‘एपी’ वृत्तसंस्था

चर्चमधील मुलांचे लैंगिक शोषण आणि मदरशांतील मुलांचे लैंगिक शोषण सारखेच !

  • एक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण वृत्त प्रसारित करते; मात्र भारतातील एकही वृत्तसंस्था किंवा अन्य प्रसारमाध्यमे कधी असा अभ्यास करत नाहीत. उलट अशा प्रकारच्या बातम्या दडपल्या जातात. त्याच वेळी हिंदु संतांवरील खोट्या आरोपांना वारेमाप प्रसिद्धी दिली जाते !
  • अनेक बायकांशी विवाह करण्याची अनुमती असतांनाही मौलवी आणि मौलाना मुलांचेही लैंगिक शोषण करतात, अशांना ‘वासनांध’ म्हणणेही अपुरेच आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

इस्लामाबाद : पाकमधील कहरोरे पक्का येथील एका मशिदीमध्ये शिकणार्‍या ९ वर्षांच्या मुलाचे मदरशातील एका मौलवीने लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. हा मुलगा मदरशातच रहात होता. रात्री झोपलेला असतांना या मौलवीने त्याच्यावर बलात्कार केला. त्याने ओरडू नये म्हणून त्याच्या तोंडात शर्ट कोंबण्यात आला होता. ही घटना एप्रिल मासामध्ये झाल्याचे वृत्त ‘एपी’ (असोशिएट प्रेस) या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे. ‘एपी’च्या वृत्तामध्ये गेल्या काही दशकांमध्ये मदरशांमध्ये झालेल्या मुलांवरील बलात्काराच्या घटनांची माहिती दिली आहे. या वृत्तात मदरशांमध्ये होणार्‍या मुलांच्या लैंगिक शोषणाची तुलना ख्रिस्त्यांच्या चर्चमध्ये होणार्‍या मुला-मुलींच्या लैंगिक शोषणाशी करण्यात आली आहे.

१. या वृत्तात म्हटले आहे की, पोलीस अशा घटनांच्या संदर्भात आरोपींवर कारवाई करण्यास घाबरतात. स्थानिक समाजामध्ये मौलवींचा असलेला प्रभाव, तसेच लैंगिक शोषणामुळे होणारी अपकीर्ती यांमुळे अशा घटना समोर येत नाहीत. पाकच्या न्यायव्यवस्थेमध्ये पीडित हानीभरपाई घेऊन दोषीला क्षमा करू शकतो, अशी तरतूद आहे. त्यामुळे अशा प्रकरणात दोषींना पकडले, तरी पीडित त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना क्षमा करतो.

२. ‘एपी’च्या प्रतिनिधीने पोलिसांत प्रविष्ट झालेल्या अशा शेकडो गुन्ह्यांचे विश्‍लेषण केले, तसेच पीडित मुलांशीही चर्चा केली.

३. मदरशांतील मुलींच्या लैंगिक शोषणाविषयी पाकच्या एका माजी मंत्र्याने सांगितले की, मदरशांत लैंगिक शोषणाच्या शेकडो घटना घडल्या आहेत. या घटना नियमितच्या आहेत; मात्र पाकमध्ये अशा घटना समोर आणणे धोकादायक असते.

४. एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, मदरशांमध्ये मुलांवरील बलात्काराच्या घटना कधीतरी घडणार्‍या नाहीत.

५. ‘एपी’ने जमा केलेल्या कागदपत्रांनुसार गेल्या १० वर्षांत ३५९ घटनांमध्ये मौलवी आणि मौलाना यांच्याकडून मुलांवर बलात्कार झाले आहेत.

६. वर्ष २००४ मध्ये एका पोलीस अधिकार्‍याने तेव्हा अशा प्रकारच्या ५०० घटनांच्या अधिकृतरित्या तक्रारी नोंदवण्यात आल्याचे सांगितले होते.

७. ‘एपी’च्या प्रतिनिधीने पाकच्या गृहमंत्र्यांशी आणि त्यांच्या मंत्रालयाशी या संदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना अनुमती देण्यात आली नाही. पाकमधील मदरसे आणि शाळा गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *