पुणे : संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. दैदिप्यमान इतिहासाचे विकृतीकरण, तसेच महापुरुष यांच्याविषयी खोटी माहिती प्रसारित करण्याच्या प्रयत्नांच्या निषेधार्थ २५ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता ऐतिहासिक शनिवारवाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राजस्थानी समाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या प्रसंगी राजस्थानी समाजाचे सचिव श्री. संतोष लड्डा, जयप्रकाश पुरोहित, अखिल राजस्थानी समाज संघाचे अध्यक्ष श्री. ओमसिंह भाटी, सचिव जयप्रकाश पुरोहित, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. सचिन निवंगुले, समस्त हिंदू आघाडीचे श्री. मिलिंद एकबोटे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी, उत्तर भारतीय विकास आघाडीचे श्री. शाळीग्राम मिश्रा पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
‘इतिहास आणि संस्कृती ही आपली दौलत आहे. त्यावर घाला घालण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही’, असे श्री. एकबोटे यांनी सांगितले.
श्री. सचिन निवंगुले म्हणाले, ‘चित्रपटातून संस्कृती आणि खरा इतिहास दाखवला जात असेल, तर आमचा विरोध नाही; पण भारतीय संस्कृतीला गालबोट लावलेले सहन करणार नाही.’’
श्री. नागेश जोशी यांनी ‘इतिहासाचे विकृतीकरण करणार्या या चित्रपटावर भारतभर बंदी घालावी’, अशी मागणी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात