भारतात आता छत्रपतींचा सत्य इतिहास सांगणेही कठीण !
गोवा शासनाच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने फर्मागुडी येथे आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात येणार्या शिवभक्तांचे प्रबोधन करणारी माहिती मिळावी, याअनुषंगाने हिंदु जनजागृती समितीने कार्यक्रमस्थळी शिवरायांचा प्रताप आणि शिवरायांची शोभायात्रा यासंबंधी दोन फ्लेक्स फलक आयोजकांची अनुमती घेऊन लावले होते. या फलकावर पुढील माहिती हिंदी भाषेत लिहिली होती.
हिंदूंनो, हा इतिहास खोटा आणि चुकीचा आहे का ?
फलक क्र. १ – छत्रपती शिवाजी महाराजांचा आठवा प्रताप ! – हिंदु राज्य स्थापनेच्या हेतूने ५ मुसलमान राज्यांशी लढून आतंकवाद मिटवला. आतंकवाद आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदु राष्ट्र्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे.
फलक क्र. २ – शिवाजी महाराजांना अशी शोभायात्रा आवडणार का ? – शोभायात्रांमध्ये होणारे मद्यपान, अश्लील नृत्य, महिलांची छेडछाड आदींमुळे छत्रपतींच्या पराक्रमाचे स्मरण कधी तरी होऊ शकेल का ? शिवाजी महाराजांचा अपमान करणार्या अनुचित कृत्यांचे मूकसंमतीदार असणार्या दर्शकांना त्याचे पाप लागते.
आयोजन करणार्या एका सदस्याने फलकावरील मजकूर आक्षेपार्ह असल्याच्या कारण पुढे करून हे फलक कार्यक्रमस्थळी उलटे ठेवले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात