मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम !
असे पुजारी देवतेची पूजा कधीतरी भावपूर्णरितीने करतील का ? धर्मशिक्षणाच्या अभावी पुजार्यांकडून मंदिरात वाद होतात. असे प्रकार टाळण्यासाठी सरकारच्या कह्यातील मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्याला आणि धर्मशास्त्रानुसार योग्य पुजार्यांची नेमणूक करण्याला पर्याय नाही ! यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात २४ नोव्हेंबरला ताठे आणि गुरव या दोन पुजार्यांमध्ये भांडणे झाल्याने श्री रुक्मिणीदेवीला १ घंटा विलंबाने नैवेद्य दाखवण्यात आला.
१. श्री रुक्मिणीदेवीला नेहमीप्रमाणे सकाळी १०.३० वाजता नैवेद्य गाभार्यात पोहोचल्यानंतर वरील दोन्ही पुजार्यांना ‘कर्तव्यासाठी नेमके कोण आहे’, ते ठाऊक नव्हते. त्यामुळे नेवैद्य कोण दाखवणार, यावरून वादावादी झाली आणि मानापमान करण्यात आले.
२. वरील प्रकरणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवार यांनी ‘या प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई करणार आहे’, असे सांगितले.
३. मंदिरामध्ये कधी भाविक विरुद्ध पुजारी, कधी पुजारी विरुद्ध पुजारी, कधी समितीचे अधिकारी विरुद्ध दलाल, तर कधी समिती विरुद्ध पुजारी अशी वादावादी ही नित्याची गोष्ट झाली आहे. (असे वाद असतील, तर मंदिरात सात्त्विकता कशी टिकून रहाणार आणि त्याचा लाभ भाविकांना कसा होणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात