भाजपचे खासदार नाना पटोले यांचा भाजप सरकारला प्रश्न
मुख्यमंत्री आणि केंद्रीयमंत्री यांना नाना पटोले यांच्या प्रश्नांविषयी काय म्हणायचे आहे ? भाजपमधील अन्य नेते याविषयी काहीच का बोलत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : भगव्या आतंकवादाच्या सूत्रावरून सरसंघचालकांना मालेगाव बॉम्बस्फोटात अडकवण्याचा प्रयत्न करणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी साहाय्य कसे करतात, असा आरोप भाजपचे खासदार नाना पटोले यांनी केला आहे. २३ नोव्हेंबरला प्रदेश काँग्रेसचे चिटणीस संजय बालगुडे यांच्या वसंतदादा सेवा संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यानात पटोले यांनी केंद्र आणि राज्य यथील भाजप सरकारवरच टीका करून घरचा अहेर दिला.
पटोले पुढे म्हणाले,
१. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात श्री. सुधाकर चतुर्वेदी हा संघाचा कार्यकर्ता होता. (हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना नाहक मालेगाव बॉम्बस्फोटात गोवण्यात आले होते, हे आता उघड झाले आहे ! – संपादक) या बॉम्बस्फोट प्रकरणात मोहन भागवत आणि उत्तरप्रदेशचे आताचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप श्री. चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.
२. मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसला ‘दिलदार शत्रू’ आणि सरकारला वाचवणारे ‘अदृश्य हात’ म्हणतात. सरसंघचालकांना गोवण्याचा प्रयत्न करणार्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक कसे केले जाते ?
३. मुंबईतील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेले अशोक कामटे यांच्या पत्नीने १२ प्रश्न विचारले होते. त्याची उत्तरे न देणारे तत्कालीन गृहमंत्री रा.रा. पाटील यांना आम्ही विधीमंडळात भंडावून सोडले होते. सत्तेत आल्यानंतर सर्वांना कारागृहात टाकले जाईल, असे वाटले होते; मात्र केवळ छगन भुजबळ यांच्यावरच का कारवाई केली ? इतरांवर का नाही ? भुजबळ एकटेच आहेत का ? सरकारने याचे उत्तर द्यायला हवे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात