- केवळ पुरो(अधो)गामी, विकसित आणि सुशिक्षित बनल्यामुळे सुसंस्कृतपणा, नैतिकता, संयम, आदी गोष्टी येत नाहीत, त्यासाठी साधना आणि धर्माचरण करण्याची आवश्यकता आहे, हे अमेरिकेच्या उदाहरणावरून भारतातील तथाकथित पुरोगाम्यांच्या लक्षात येईल का ?
- पाश्चात्त्यांचे अंधानुकरण केल्यावर भारतातही हीच स्थिती निर्माण झाली आहे, हे पुरो(अधो)गामी स्वीकारतील का ? परस्त्रीला मातेसमान मानणार्या हिंदु धर्माचे शिक्षण देऊन मुलांवर लहानपणीच सुसंस्कार केले, तर ही स्थिती निर्माण होणार नाही, हे भारतीय शासनकर्त्यांना, शिक्षणतज्ञांना आणि सुधारणावाद्यांना कळेल तो सुदिन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
वॉशिंग्टन : सध्या अमेरिकेतील चित्रपटसृष्टी हॉलिवूडमध्ये महिलांच्या लैंगिक छळाची प्रकरणे उघड होत आहेत. त्यातच आता ६० टक्के अमेरिकी महिलांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी लैंगिक छळाला सामोरे जावे लागल्याचे समोर आले आहे. त्यांच्यापैकी दोन तृतीयांश महिलांनी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाल्याचे सांगितले. लैंगिक छळाच्या प्रकारांविषयी क्विनीपिअॅक विश्वविद्यालयाने केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
१. या सर्वेक्षणामध्ये केवळ २० टक्के पुरुषांनी लैंगिक छळाचा अनुभव आल्याचे म्हटले आहे. त्यातील ६० टक्के पुरुषांनी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाल्याचे म्हटले आहे.
२. ज्या महिलांनी लैंगिक छळ झाल्याचे सांगितले त्यांच्यापैकी ६९ टक्के महिलांनी तो कामाच्या ठिकाणी झाल्याचे म्हटले आहे. ४३ टक्के महिलांनी सामाजिक ठिकाणी, तर ४५ टक्के महिलांनी रस्त्यावर, १४ टक्के महिलांनी घरातच लैंगिक छळ झाल्याचे म्हटले आहे.
३. लैंगिक छळवणूक हा गंभीर प्रश्न असल्याचे ८९ टक्के जणांनी म्हटले. ५५ टक्के लोकांनी प्रसारमाध्यमांवर लैंगिक छळाच्या तक्रारींची वाच्यता होत असल्याने आता त्याविषयीची जागरूकता वाढली असल्याचे सांगितले.
४. अमेरिकी समाजात महिला आणि पुरुष लैंगिक छळाला मोठ्या प्रमाणात सामोरे जातात, असे दिसून आले आहे. १० पैकी ८ महिलांच्या मते, त्यांना लक्ष्य करून अशा प्रकारचा छळ करण्यात आला, असे क्विनीपिअॅक विश्वविद्यालयाचे टिम मॅलॉय यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात