- हिंदूंच्या मंदिरांवर जितक्या तत्परतेने कारवाई केली जाते, तितक्या तत्परतेने अन्य पंथियांच्या अनधिकृत प्रार्थनास्थळांवर मात्र कदापि केली जात नाही, हे लक्षात घ्या !
- अनधिकृत बांधकामांवरील कारवाईकडे मात्र कानाडोळा – संपादक, दैनिक सनातन प्रभात
डोंबिवली : सांगाव येथील एम्आयडीसीच्या जागेत असलेले श्री शनिमंदिर अनधिकृत असल्याचे सांगत महानगरपालिकेने ते २४ नोव्हेंबरला प्रचंड पोलीस बंदोबस्तात पाडून टाकले. या परिसरात गेल्या १० वर्षांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत.
हे मंदिर ‘प्रति शनीशिंगणापूर’ म्हणून ओळखले जात होते. शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भक्तांची पुष्कळ गर्दी होत असे, तसेच अनेक धार्मिक विधी, पूजाही होत असे. कारवाईच्या वेळी काही भक्तांनी यास विरोध केला; मात्र त्याला न जुमानता हे मंदिर पाडण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून डोंबिवलीतील मंदिरांवर कारवाईचा सपाटा चालू आहे; मात्र शहरात अनेक ठिकाणी अवैध बांधकाम होत असतांना त्याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा केला जात आहे. याविषयी येथील हिंदूंकडून खेद व्यक्त केला जात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात