Menu Close

जळगाव येथे धर्मांधांच्या तक्रारीवरून महानगरपालिकेने काढलेला अफझलखानवधाचा फलक हिंदुत्वनिष्ठांनी पुन्हा लावला

  • अफझलखानवधाचा फलक लावण्यासाठी पुढाकार घेणार्‍या धर्मप्रेमींचे अभिनंदन ! या हिंदूविरांचा आदर्श सर्वत्रच्या हिंदूंनी घ्यावा !
  • अफझलखानवधाचा फलक काढणारी महानगरपालिका आणि पोलीस भारताचे कि पाकचे ? ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्र आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या चित्रामुळे भावना दुखावणार्‍या धर्मांधांच्या निष्ठा कुणाशी आहेत ? शिवरायांच्या आदर्श सांगणार्‍या भाजप सरकारच्या राज्यात असा प्रकार होणे, हे सरकारला लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
प्रशासनाने काढलेला अफझलखानवधाचा फलक पुन्हा लावतांना धर्मप्रेमी युवक

जळगाव : २६ नोव्हेंबर या दिवशी शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने येथील शिवाजीनगर पुलावर हिंदुत्वनिष्ठांनी लावलेल्या अफझलखानवधाच्या फलकामुळे १५ ते २० धर्मांधांनी जळगाव पोलीस ठाण्यात भावना दुखावल्याची तक्रार केली. (अफझलखानाच्या वधामुळे ज्या धर्मांधांच्या भावना दुखावतात, त्या धर्मांधांचा अफझलखान कोण लागतो ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या तक्रारीची नोंद घेत पोलिसांनी तात्काळ महानगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधून हा फलक काढायला सांगितला. त्यानंतर महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने तात्काळ हा फलक काढला. ही गोष्ट येथील हिंदुत्वनिष्ठांना कळताच श्री. विशाल पवार यांच्यासह अन्य धर्मप्रेमींनी याचा पोलिसांना जाब विचारून पुन्हा त्याच जागी फलक लावला.

शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने २४ नोव्हेंबरच्या रात्री श्री. विशाल पवार आणि त्यांच्या मित्रमंडळींनी हा फलक लावला होता. विशेष म्हणजे या पुलावर काही दिवसांपूर्वी टिपू सुलतान जयंतीच्या निमित्ताने अनधिकृतरित्या ३-४ फलक लावण्यात आले होते. हे फलक ४ दिवस तसेच होते. (अफझलखानाच्या वधाचा फलक काढायला तत्परता दाखवणारे पोलीस आणि प्रशासन क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे फलक लावल्यावर तत्परतेने कारवाई का करत नाहीत ? यावरून पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन यांची हिंदुद्वेषी मानसिकता उघड होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

४०० धर्मांध जमा झाल्याने फलक पुन्हा काढला !

धर्माभिमान्यांनी पुन्हा लावलेल्या फलकाजवळ ४०० धर्मांध गोळा झाल्याने सायंकाळी ६ वाजता हा फलक पुन्हा काढण्यात आला. या वेळी पोलिसांनी फलक लावणार्‍या धर्माभिमानी तरुणांची नावे लिहून घेतली. तरुणांना ‘तुम्ही संख्येने ३-४ जणच आहात. धर्मांधांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तुम्हाला संरक्षण देता येणार नाही, केवळ फलकाचे संरक्षण करू’, असे सांगितले. (धर्मांधांच्या संख्येपुढे नांगी टाकणारे पोलीस निश्‍चितपणे नागरिकांचे संरक्षण करू शकत नाहीत, हे या घटनेवरून सिद्ध होते. यासाठी हिंदूंनी पोलिसांवर अवलंबून न रहाता स्वरक्षणासाठी संघटित होण्याला पर्याय नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *