कायदा-सुव्यवस्था बिघडण्याचे आणि फलकाला अनुमती न घेण्याचे कारण
छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगितल्याने कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते, असे पोलिसांना म्हणायचे आहे का ? अफझलखानवधाच्या फलकाला विरोध करणारे पोलीस उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र लावयलाही विरोध करतील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नाशिक : नाशिक येथे श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध करतांनाचे चित्र असलेला फलक लावला होता. नाशिक पोलिसांनी नोटीस पाठवून हा फलक काढण्यास भाग पाडले. फलक काढण्याचे कारण देतांना ‘फलक लावण्यासाठी अनुमती घेतलेली नाही, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो’, असे दिले आहे.
नाशिक पोलिसांनी मुंबई पोलीस अधिनियम, अधिनियम क्रमांक २२, कलम ३६, ३७ आणि ३८ आणि भा.दं.वि. १४९ नुसार श्री शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवली. त्यामध्ये पोलिसांनी हा फलक लावण्याची अनुमती घेतलेली नाही. यापूर्वी या फलकावरून गणेशोत्सवाच्या वेळी मिरज, सांगली येथे जातीय दंगल होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या फलकावरून काही नागरिकांच्या भावना दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद केले आहे. काही स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी सांगितले की, टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यास पोलीस अडवत नाहीत; मात्र अफझलखानवधाचा फलक काढायला लावतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात