मिरज : काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणे वाढत आहेत. अशा स्थितीत छातीवर गोळ्या झेलून प्राणार्पण करणारे सैनिक हेच आमच्या देशाचे खरे रक्षक आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या शेकडो क्रांतीकारकांनी देशासाठी बलीदान केले. त्यामुळे उद्या वेळ येताच देशासाठी महाराष्ट्र पुन्हा पुढेच उभा राहील, असे मार्गदर्शन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी केले. ते येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर झालेल्या सभेत बोलत होते. या वेळी गृहराज्यमंत्री श्री. दीपक केसरकर, जलसंपदा राज्यमंत्री श्री. विजय शिवतारे, मिरज शिवसेना शहरप्रमुख श्री. विशाल राजपूत आणि श्री. चंद्रकांत मैगुरे यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
श्री. उद्धव ठाकरे म्हणाले की….
१. या भागात शिक्षणसम्राट कुणाच्या जोरावर मोठे झाले ? त्यांना दणका द्या. आमच्या घरात पीठ नाही आणि यांच्याकडे एकावर एक विद्यापीठ अशी स्थिती आहे.
२. शेतकर्यांच्या बळावर शिवरायांनी औरंगजेबाच्या छाताडावर भगवा रोवला. शेतकर्यांच्या व्यथांसाठी मीही मुख्यमंत्र्यांना भेटेन.
३. ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची नोंद इंग्रजी सत्तेने घेतली, त्या शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे आपण संघटित झाले पाहिजे.
४. राजापूरची वखार लुटली, असे शिवरायांविषयी सांगितले जाते. प्रत्यक्षात ती पन्हाळा किल्ल्याला वेढा टाकणार्या सिद्धी जोहरला साहाय्य करणार्या इंग्रजांना दिलेली शिक्षा होती.
५. औरंगजेब आणि अफझलखान यांच्या मोगलाईत या भूमीत तेज जन्माला आले. त्या छत्रपती शिवराय यांच्यामुळे आज आपल्या हाती भगवा आहे, अन्यथा हिरवे झेंडेच असते !
विशेष
‘सभेपूर्वी प्रतापगडाच्या दिशेने निघालेल्या भगव्या झेंड्याची मला पूजा करायला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो’, असेही श्री. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात