ऑस्ट्रेलियात विज्ञापनामध्ये श्री गणेशाला मांसाहार करतांना दाखवल्याचे प्रकरण
सिडनी : ऑस्ट्रेलियातील ‘मीट अॅण्ड लाईव्हस्टॉक’ (एम्.एल्.ए.) या आस्थापनाने त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी केलेल्या विज्ञापनात श्री गणेश, येशू ख्रिस्त, बुद्ध आणि इतर धर्मातील प्रमुखांना एकत्र बसून मांसाहार करतांना दाखवले होते. या विरोधात ऑस्ट्रेलियातील आणि इतर देशातील हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने त्यांनी निषेध नोंदवत या आस्थापनाला विज्ञापन मागे घेण्याची मागणी केली होती; मात्र एम्.एल्.ए. आस्थापनाने त्यांना अपेक्षित प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे हिंदू संघटनांनी ऑस्ट्रेलियातील ‘अॅडव्हर्टायजिंग स्टॅण्डर्ड ब्युरो’ (विज्ञापन मानक संस्था’) या संस्थेकडेही तक्रार केली होती; मात्र या संस्थेनेही ‘या विज्ञापनातून देवतांचे विडंबन होत नाही’, असे सांगत हात झटकले होते; मात्र हिंदू संघटनांच्या रेट्यामुळे या संस्थेला माघार घेणे भाग पडले आणि शेवटी ‘श्री गणेशाला मांसाहार करतांना दाखवल्यामुळे या विज्ञापनाने देशातील विज्ञापनांच्या मानकांचे खंडण होते’, असा निर्णय देऊन विज्ञापन देणार्या आस्थापनाला धारेवर धरले. (देवतांच्या विडंबनाच्या संदर्भात पाठपुरावा करणार्या ऑस्ट्रेलियातील हिंदू संघटनांचे अभिनंदन ! या संघटनांकडून भारतातील हिंदू संघटना काही शिकतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
विज्ञापन मानक संस्थेने दिलेल्या निर्णयात ‘श्री गणेश ही परिपूर्णतेची देवता असून या विज्ञापनामुळे हिंदु धर्म आणि हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत’, असे म्हटले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील हिंदूंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तेथील हिंदु समाजाचे नेते श्री. कार्तिक अर्सू आणि विदेशी भारतियांचे नेते श्री. जय शहा यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणी एकजूट दाखवल्यासाठी हिंदूंचे आभार मानले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात