Menu Close

चाईबासा (झारखंड) येथे लव्ह जिहादमध्ये फसलेल्या हिंदु तरुणीची आत्महत्या

लव्ह जिहादला प्रेम संबोधणार्‍यांना ही असहिष्णुता दिसत नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

चाईबासा (झारखंड) : येथे १२वीत शिकणारी अंजली प्रसाद या तरुणीने नुकतीच आत्महत्या केली. या आत्महत्येच्या प्रकरणी अंजलीचे वडील यतींद्रनाथ प्रसाद यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फरहान अहमद या  तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. फरहानने अंजलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला धर्मांतर करण्यास दबाव आणल्याने तिने आत्महत्या केली, असे यतींद्रनाथ प्रसाद यांनी तक्रारीत म्हटले आहे.

फरहान अहमदने अंजलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तो अंजलीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आणि धर्मांतर करण्यासाठी दबाव निर्माण करत होता. अंजली धर्मांतरासाठी नकार देत असल्याने तो तिला मारहाणही करायचा. त्याने तिचा छळ कला. याविषयीची माहिती शेजार्‍यांकडून मिळाली, असे यतिंद्रनाथ प्रसाद यांनी सांगितले. सूत्रांनी सांगितले की, अंजली फरहानच्या जाळ्यात इतकी फसली होती की, ती रात्री २ वाजताही त्याच्या घरी जात होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *