Menu Close

रोहित सरदाना यांचे मस्तक कापणार्‍याला १ कोटी रुपयांच्या पारितोषिकाची घोषणा करणार्‍या धर्मांधाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार

धर्मांधांच्या कारवायांच्या विरोधात तक्रार करणारे डॉ. सुजित यादव यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मुंबई : ‘आज तक’ या वृत्तवाहिनीचे निवेदक रोहित सरदाना याचे मस्तक कापणार्‍याला १ कोटी रुपयांच्या पारितोषिकाची घोषणा करणार्‍या महंमद हुसेनी याच्या विरोधात नालासोपारा येथील धर्माभिमानी डॉ. सुजित यादव यांनी २६ नोव्हेंबर या दिवशी येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

पत्रकार रोहित सरदाना यांनी ‘चित्रपटांना हिंदूंच्या देवतांची निंदा करणारी नावे ठेवता, मग अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचे नाव देण्याची हिंमत का होत नाही ?’, असा प्रश्‍न ‘सेक्सी दुर्गा’ या चित्रपटाच्या नावावरून उपस्थित केला होता. यामध्ये सरदाना यांनी ‘फातिमा’ यांचे अशा प्रकारे चित्रपटाचे नाव देण्यात येईल का ?’ असा प्रश्‍न उपस्थित केला होता. (स्वत:च्या श्रद्धास्थानांच्या आघातांच्या विरोधात तत्परतेने नोंद घेणार्‍या धर्मांधांकडून हिंदू काही शिकतील का ? आज हिंदूंच्या देवता, श्रद्धास्थाने यांचा विविध माध्यमांतून मोठ्या प्रमाणात अवमान सातत्याने होत असूनही हिंदू अद्यापही जागृत होत नाहीत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या विधानावरून मुसलमानांच्या भावना दुखावल्याचे सांगून हुसेनी यांनी वरील घोषणा केली. तसेच ‘सरदाना यांचे मस्तक कापणार्‍याच्या संपूर्ण जीवनाचा खर्चही आम्ही उचलू’, असे घोषित केले आहे. (हिंदूबहुल देशात हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या अवमानाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या पत्रकाराला धर्मांधांकडून अशा प्रकारे धमकी देण्याचे धाडस होणे, हे सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लज्जास्पद होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *