नागपूर येथील हिंदू धर्मजागृती सभा
नागपूर : हिंदूंचे धर्मांतर, देवतांच्या मूर्तीचे भंजन, गोहत्या, लव्ह जिहाद आदी माध्यमांद्वारे धर्मांधांच्या कारवाया वाढत आहेत. धर्मांध शक्तींना निष्प्रभ करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने धर्महानी रोखण्यासाठी कृतीशील व्हावे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे वक्ते श्री. कपिल देव यांनी केले. येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. ‘धर्माचरण आणि ईश्वराची भक्ती करण्यासह धर्मसंस्कृतीचेही रक्षण म्हणजे धर्महानी रोखणे हे आपले कर्तव्य असून काळानुसार धर्मपालनच आहे’, असे ते म्हणाले.
समितीचे श्री. अतुल आर्वेन्ला यांनी समितीच्या वाढत्या कार्याविषयी माहिती दिली. सभेचे सूत्रसंचालन सौ. श्रद्धा अमित रहाटे यांनी केले.
रणरागिणी शाखेच्या सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि शौर्यजागरण यांची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले.
सभेच्या शेवटी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेण्यात आली. ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’च्या उत्साहपूर्ण जयघोषाने आणि श्लोकाने सभेची सांगता झाली.
क्षणचित्रे
१. कृतीशील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी सभेला उपस्थित होते.
२. श्री. विजय बोंद्रे यांनी सभेसाठी मंदिराचे सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.
३. सौ. चंद्रकला रासेकर यांनी सेवेसाठी आलेल्या साधकांच्या थांबण्याची, सौ. यशवंतीबेन पटेल यांनी अल्पाहाराची, तर श्री. वासुदेव बोंडे यांनी साधकांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली.
४. सौ. सिंधुबाई नवभिंगे यांच्या पायाची १५ शस्त्रकर्मे झाल्याने त्यांना चालण्याचा त्रास होत असूनही त्या सभेला उपस्थित होत्या.
५. उपस्थितांनी धर्मशिक्षणवर्ग, बालसंस्कारवर्ग आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग यांची मागणी केली.
६. सभेनंतर झालेल्या बैठकीला १८ पुरुष आणि २२ महिला उपस्थित होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात