पनवेल येथे हिंदु धर्मजागृती सभा
पनवेल : विश्वात १०० कोटी हिंदूंसाठी एकही स्वतंत्र राष्ट्र नाही. स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेल्या भारतातच हिंदु राष्ट्राच्या मागणीला विरोध होतो. देशभरात हिंदुविरोधी सुनियोजित षड्यंत्रे चालू आहेत. केरळमध्ये लव्ह जिहादची ९० हून अधिक प्रकरणे राष्ट्रीय गुन्हे तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आली आहेत. पनवेलमध्ये ३०० युवती बेपत्ता झाल्या आहेत. यामागे लव्ह जिहाद तर नाही ना, याचाही पोलिसांनी शोध घ्यायला हवा. विस्थापित काश्मिरी हिंदूंचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही, हिंदूंची धर्मांतरे थांबत नाहीत. हे असेच चालू रहाणार असेल, तर हिंदूंना त्यांच्या हक्काचे हिंदु राष्ट्र जोरकसपणे मागावेच लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी केले. ते आंध्र कला समिती सभागृह, नवीन पनवेल येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ नोव्हेंबर या दिवशी पार पडलेल्या सभेच्या वेळी सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नंदिनी सुर्वे यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. सभेला सनातनच्या पू. (सौ.) अश्विनी पवार यांची वंदनीय उपस्थिती लाभली. सभेला १५० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर
स्वराज्य मावळ प्रतिष्ठानचे श्री. गुरुनाथ मुंबईकर, महाराणा प्रताप बटालियनचे श्री. अजयसिंह सेंगर, दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ संप्रदायचे श्री. नेताजी पाटील, श्री स्वरूप संप्रदायाच्या सौ. लक्ष्मी आणि गायत्री परिवाराचे श्री. प्रद्युम्न कुमार शर्मा, सौ. उषा शर्मा आणि श्रीमती मीरा सिंह
विशेष सहकार्य
भाजपचे आमदार श्री. प्रशांत ठाकूर आणि आंध्र कला समितीचे चिटणीस श्री. शंकर राव यांचे सभेला विशेष सहकार्य लाभले.
१ डिसेंबरला सायंकाळी ७.३० वाजता आढावा बैठक !
स्थळ : जलाराम मंदिर, संत साईबाबा शाळेच्या मागे, सेक्टर १८, नवीन पनवेल
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात