सांगली : अनेकांना जीवनात ताण येतो. त्याचा शरिरावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी अनेकजण शारीरिक किंवा मानसिक उपाययोजना करतात. तात्पुरती उपायोजना केल्याने ताण नाहीसा होत नाही, तर नामसाधना केल्याने चिरंतन आनंदी जीवन जगता येते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजाराम रेपाळ यांनी केले. त्यांनी येथे ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन केले. श्री. लक्ष्मीदास मयेकर यांनी समितीच्या कार्याची आणि वक्त्यांची ओळख करून दिली, तसेच देवस्थानचे ट्रस्टी आणि पुजारी यांनी सहकार्य केल्याविषयी त्यांचे आभार मानले. या वेळी ३२ जिज्ञासू उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात