हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शौर्य जागृत करण्याची नेवासा (बु.) येथील हिंदूंची प्रतिज्ञा
नेवासा (बु.) (जिल्हा नगर) : २६/११ सारख्या आतंकवादी आक्रमणांना योग्य उत्तर द्यायचे असेल, तर शिवप्रतापदिन अर्थात अफझलखानवध दिनासारखे शौर्य वारंवार गाजवण्याची आज आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी केले. शिवप्रतापदिनानिमित्त २६ नोव्हेंबर या दिवशी येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत त्या बोलत होत्या.
गोरक्षक श्री. संतोष पंडुरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सौ. आनंदी वानखडे यांनी समितीच्या कार्याविषयी उपस्थितांना अवगत केले. कु. चैताली डुबे आणि श्री. राहुल मराठे यांनी सूत्रसंचालन केले. २३० हून अधिक हिंदू सभेला उपस्थित होते. हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
क्षणचित्रे
१. सभेला श्री विश्वेश्वर नाथबाबा देवस्थानने विनामूल्य सभागृह, तसेच श्री. राजाभाऊ उपाध्ये यांनी पटल आणि चटया विनामूल्य उपलब्ध करून दिल्या.
२. सभेचे नियोजन धर्मशिक्षण वर्गातील तरुणांनी केले होते.
३. सभेला ९८ टक्के तरुणांची उपस्थिती होती.
४. सभेनंतरच्या बैठकीत २ डिसेंबर या दिवशी शौर्यजागरण शिबीर घेण्याचे ठरले. युवकांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाची मागणी केली.
५. नेवासा येथील स्थानिक आमदार बाळासाहेब मुरुकुटे यांनी सभास्थळी भेट दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात