मंदिर प्रशासनाचा मनमानी कारभार
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
तुळजापूर : नवरात्रोत्सव काळात येथील तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहातील चांदीच्या दरवाजाचा उंबरठा मंदिर प्रशासनाने तात्पुरता काढला होता; मात्र तो अद्यापपर्यंत बसवण्यात आलेला नाही. (चांदीचा उंबरठा काढण्यामागे आणि तो अद्यापपर्यंत न बसवण्यामागे कोणती कारणे आहेत, याचे उत्तर मंदिर प्रशासनाने भक्तांना दिले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. नवरात्रोत्सवानंतर मंदिरातील गर्दी ओसरल्यानंतर पुजार्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. वास्तविक नवरात्रोत्सव संपल्यानंतर मंदिरातील गर्भगृहाचा उंबरठा पुन्हा बसवणे अपेक्षित होते.
२. मंदिराच्या गर्भगृहासमोरील चांदीचा दरवाजा १८ व्या शतकातील आहे. दरवाज्याच्या उंबरठ्यावर भाविक श्रद्धेने माथा टेकून नमस्कार करतात.
३. तसेच १०० रुपये शुल्क आकारून ‘व्हीआयपी पास’ घेणार्या भाविकांना देवीच्या जवळून, तर दर्शन रांगेतील भाविकांना १० फूट दूर अंतरावरून दर्शन देण्यात येत आहे. त्यामुळे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांची लूट केली जात असल्याचा आरोप भाविकांकडून होत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात