केरळ येथील लव्ह जिहादचे प्रकरण
नवी देहली : मला माझ्या कुटुंबात आतंकवादी नको, असे विधान केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणातील तरुणी अखिला हिचे वडील अशोकन् यांनी केले आहे. अखिला हिला सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडूमधील सेलम येथील होमिओपॅथी महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी पाठवण्याच्या दिलेल्या निर्णर्यावर त्यांनी वरील विधान केले. या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.
अशोकन् पुढे म्हणाले, ‘‘अखिला हिला सीरियामध्ये जायचे आहे; पण तिथे काय परिस्थिती आहे, याविषयी तिला काहीच माहीत नाही. मी तिला कैदेत ठेवले नव्हते. तिच्या घराबाहेर पोलिसांचे पथक संरक्षणासाठी तैनात होते. आता सालेममध्ये ती न्यायालयाच्या देखरेखीखाली आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. मला न्यायालयाने अनुमती दिली, तर मी तिची भेट घेण्यास सिद्ध आहे.’’
अखिला हिला २८ नोव्हेंबरला पोलिसांच्या संरक्षणात सेलम येथील महाविद्यालयात पाठवण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात