Menu Close

भगवा ध्वज हातात देऊन मुस्लिम पोलिसाची धिंड

हिंदूंची क्रांतीच्या दिशेने होत असलेली वाटचाल – संपादक, हिंदुजागृती

रेणापूर : भगवा ध्वज लावण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याच्या कारणावरून संतप्त जमावाने पोलिस चौकीत घुसून कर्तव्य बजावणाऱ्या दोन पोलिसांना बेदम मारहाण केली. चौकीतील कागदपत्रांची व साहित्याची नासधूस करत सहायक पोलिस उपनिरीक्षकाच्या हातात भगवा ध्वज देऊन पोलिस चौकीपासून वादग्रस्त जागेपर्यंत धिंड काढल्याची घटना शुक्रवारी (ता. १९) घडली.

लातूर जिल्ह्यातील पानगाव (ता. रेणापूर) येथे ही घटना घडली आहे. या मारहाणीत दोन पोलिसांपैकी एक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लातूर येथे उपचार सुरू आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पानगाव येथील आंबेडकर चौक ते रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुभाजकातील जागेवर येथील शिवभक्तांनी भगवे ध्वज लावण्याचा प्रयत्न गुरुवारी (ता. १८) मध्यरात्री केला. यावेळी कर्तव्यावर असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक वाय. पी. शेख हे घटनास्थळी गेले व त्यांनी या जागेवर ध्वज लावू नका, अशी विनंती शिवभक्तांना केली. त्यानंतर तेथून सर्वजण निघून गेले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी शहरात घडलेल्या घटनेची  चर्चा गावात पसरवली गेली व पोलिसांनी सदरील जागेवरील भगवे ध्वज काढून टाकल्याची शहरात पसरल्याने संतप्त हिंदूंनी गाव बंद करण्याचे आवाहन करीत पोलिस चौकीवर धडकले.

संदर्भ : सकाळ

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *