Menu Close

हिंदुहित साधण्यासाठी संघटनाची आवश्यकता ! – विनायक पावसकर, अध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन

वाई (जिल्हा सातारा) येथे प्रतापगड उत्सव समिती आयोजित शिवप्रतापदिन उत्साहात

(१) आमदार श्री. भरतशेठ गोगावले पुरस्कार स्वीकारतांना समवेत अन्य मान्यवर

वाई (जिल्हा सातारा) : अफझलखानवधाच्या चित्राचे निमित्त करून गणेशोत्सव आणि शिवजयंती यांच्या कार्यक्रमांमध्ये अडथळे आणले जात आहेत. व्यवस्थेकडून अनेक दशकांपासून हिंदूंचे दमन होत असूनही युवक अधिक जोमाने कार्य करत असल्याचे आश्‍वासक चित्र सध्या दिसत आहे. हिंदुहित साधण्यासाठी संघटित कृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदू एकता आंदोलनचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. विनायक पावसकर यांनी केले. येथील महागणपति घाटावर २६ नोव्हेंबरला (शिवप्रतापदिनी) प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. आरंभी शाहीर हेमंत मावळे आणि सहकार्‍यांनी पोवाडा सादर केला. सूत्रसंचालन श्री. आनंद पटवर्धन आणि आभार प्रदर्शन श्री. स्वप्नील भिलारे यांनी केले. उपस्थितांना प्रसादवाटप करण्यात आले.

‘वीर जिवाजी महाले’ आणि ‘पंताजीकाका बोकील अभिवक्ता’ पुरस्कारांचे वितरण !

हिंदुत्वाच्या कार्यात भरीव योगदान दिल्याविषयी महाड येथील आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांना ‘वीर जिवाजी महाले’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हिंदुहितासाठी कार्यरत असणारे अधिवक्ता महेश कुलकर्णी यांना ‘पंताजीकाका बोकील अभिवक्ता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अधिवक्ता कुलकर्णी हे मांढरदेव आणि सज्जनगड या देवस्थानांचे विश्‍वस्त आहेत.

‘शिवजयंती तिथीनुसारच साजरी व्हावी, ही समस्त शिवप्रेमींची मागणी आहे. सद्यकाळात हिंदूंनी धर्म-संस्कृतीच्या नीतीनियमानुसार आचरण केल्यासच आपला टिकाव लागेल’, असे श्री. गोगावले यांनी सांगितले.

‘अफझलखानवध हा धर्माने केलेला अधर्माचा नाश आहे. सर्वांनी धर्मग्रंथाचे वाचन करून त्यानुसार आदर्श आचरण केले पाहिजे’, असे अधिवक्ता महेश कुलकर्णी यांनी सांगितले.

कार्यक्रमास प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले, हिंदू एकता आंदोलनचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. विनायक पावसकर, नगराध्यक्षा डॉ. (सौ.) प्रतिभा शिंदे, अधिवक्ता उमेश सणस, शिवसेनेचे श्री. प्रदीप माने, श्री. बाबूजी नाटेकर, अधिवक्ता शिरीष दिवाकर, वेदमूर्ती शंकरराव अभ्यंकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा समन्वयक श्री. यशवंत लेले, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांसह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *