इस्लामाबाद : लष्कर-ए-तोयबाचा मी सर्वात मोठा समर्थक आहे आणि तोयबालाही मी आवडतो, असे विधान पाकचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी केले आहे. मुशर्रफ यांनी लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावा यांच्याकडून काश्मीरमध्ये केल्या जाणार्या कारवायांचेही समर्थन केले आहे. भारताने अमेरिकेच्या साहाय्याने हाफिज सईद याला आतंकवादी घोषित केले आहे. हाफिज सईदला मी अनेकदा भेटलो आहे, असेही ते म्हणाले. (भारतद्वेषी असणारे आणि कारगिल युद्ध घडवणारे मुशर्रफ हे याहून वेगळे काय सांगणार ? आताचेही पाक सरकार असेच आहे. त्यामुळेच या संघटनेवर कारवाई होत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात